घरक्राइमDelhi Shahdara Gang Rape : महिलेसह लहान मुलांकडूनही बलात्कार पीडितेला बेदम मारहाण,...

Delhi Shahdara Gang Rape : महिलेसह लहान मुलांकडूनही बलात्कार पीडितेला बेदम मारहाण, क्रूरतेचा कळस गाठणारा नवा व्हिडीओ

Subscribe

देश प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष करत असताना त्याच दिवशी राजधानी दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडत होती.

दिल्लीतील शाहदरामधील कस्तुरबा नगर परिसरात प्रजासत्ताक दिनी तरुणीवर अवैध दारु विक्री करणाऱ्या काही जणांनी गँग रेप केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. एवढचं नाही तर या पीडितेवर गँग रेप करत तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र हे नराधम इतक्यावरचं थांबले नाही तर त्यांनी पीडितेचे मुंडन करुन तिची धिंड काढली. या क्रूर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरु करत आत्तापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

क्रूर घटनेच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसले?

दिल्लीतील शाहदरामधील कस्तूरबा नगर हा एक परिसर. येथील एका छोट्याश्या खोलीत एका महिलाचा किंचाळण्याचा मोठ्याने आवाज येत होता. बेल्ट आणि लाठ्यांचा सतत मारा त्या महिलेवर केला जात होता. यावेळी मारणाऱ्या रानटी ह्रदयाच्या लोकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्या महिलेचे किंचाळणे ऐकून दगडाचे ह्रदयही गलबलले असते. पण तिला मारणाऱ्या दगडाच्या काळजाच्या लोकांना तिच्या वेदना जाणवल्याच नाहीत. एवढेच नाही तर तिथे उपस्थित आरोपी हे सर्व क्रूरतेचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद करत होते.

- Advertisement -

पीडितेला मारणाऱ्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. एक अल्पवयीन पीडितेला बेल्टने मारून दमला की दुसरा अल्पवयीन मुलगा बेल्ट घेऊन मारहाण करू लागायचा. यावेळी पीडित महिला जीव तोडूस तोवर रडत असते. पीडितेला मारून मन भरत नाही तोवर माणुसकी नसलेली हे हैवान तिचे पाय धरून ओढतात. यानेही समाधान न झाल्याने एका महिला हेअर क्लिपरने पीडितेचे केस कापले.

देश प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष करत असताना त्याच दिवशी राजधानी दिल्लीत माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडत होती. कड़कड़डूमा येथील भाड्याच्या घरातून या पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिला कस्तुरबा नगर भागातील घरात डांबून ठेवले जाते. यानंतर तिच्यावर अत्याचार केले जातात. महिलेचे टक्कल करून, तोंडाला काळ फासून तिची चपलांचा हार घालून क्रूर लोकांनी तिची परिसरात धिंड काढली. याच परिसरात महिलेचे माहेरही होते. या घटनेचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्या पीडितेला बेदम मारणार केल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाचेही हृदय हादरले जाईल .

- Advertisement -

पीडितेचे अपहरण केल्यानंतर आरोपी महिलांच्या सांगण्यावरून दोन अल्पवयीन व त्याच घरातील आणखी एका मुलाने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. अनैसर्गिक सेक्स केल्यानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरचीही टाकण्यात आली. पीडित महिला एका मुलाची आई आहे. आरोपीच्या भीतीमुळे ती तिच्या माहेरच्या व सासरच्या घरापासून दूर कड़कड़डूमा परिसरात भाड्याच्या घरात राहायची.

आरोपींनी प्रथम तिचे कड़कड़डूमा येथून अपहरण केले, त्यानंतर तिला खोलीत कोंडून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. केस कापून, चेहऱ्याला काळ फासून आणि चपलांचा हार घालून तिची संपूर्ण परिसरात धिंड काढण्यात आली. आरोपींच्या कुटुंबातील एका अल्पवयीन तरुणाने नोव्हेंबरमध्ये आत्महत्या केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यासाठी आरोपींच्या कुटुंबीयांनी या पीडित महिलेला जबाबदार ठरवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. तसेच व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 15 आरोपींची ओळख पटवली आहे.


आता Ration Card वर मिळणार स्वस्तात पेट्रोल! ‘या’ लोकांना होणार फायदा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -