Homeक्राइमSindhudurg Crime : सहकारी संस्थांचे उपनिबंधक आणि कार्यालय अधीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात

Sindhudurg Crime : सहकारी संस्थांचे उपनिबंधक आणि कार्यालय अधीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात

Subscribe

सिंधुदुर्गात सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग : सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना आज रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक वर्ग 1 माणिक भानुदास सांगळे व कार्यालय अधीक्षक वर्ग 3 उर्मिला महादेव यादव या दोघांना 33 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Deputy Registrar and Office Superintendent of Cooperative Societies in Sindhudurg caught in bribery scam)

गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी यातील तक्रारदार यांचे स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करून जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता रुपये 50,000/- रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार 10 जानेवारी 25 रोजी प्राप्त झाली होती. दिनांक. 16 जानेवारी 2025 रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 40,000/- लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. सिंधुदुर्ग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नेतृत्वाखाली दोन्ही आरोपी लोकसेवकांविरुद्ध दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा – Fraud : महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल 51 हजार कोटींची फसवणूक, आर्थिक घोटाळे करण्यात हे शहर आघाडीवर

काय आहे प्रकरण?

आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे रुपये 33,000/- लाचेची मागणी केली, तर आरोपी लोकसेविका उर्मिला यादव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करीत असताना आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांना तिथे हजर राहून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. यानंतर पंच साक्षीदार यांच्या समक्ष तक्रारदारांकडून माणिक सांगळे व उर्मिला यादव यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा – Nashik : पंचवटीतील टोळीयुद्धातून गोळीबार; गावठी कट्टे आणि अवैध हत्यारांचा वापर


Edited By Rohit Patil