डॉक्टरांनी मूतखड्याऐवजी काढली चक्क रुग्णाची किडनी, ११ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश

doctor removes kidney instead of stone hospital to pay rs 11.2 lakh damages in gujarat
डॉक्टरांनी मूतखड्याऐवजी काढली चक्क रुग्णाची किडनी, ११ लाख नुकसान भरपाई देण्याचे आदेश

गुजरातमध्ये एका डॉक्टरांनी रुग्नावरील शस्त्रक्रियेदरम्यान मुतखडा काढण्याऐवजी त्याची किडनी काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया रुग्णाच्या जीवावर उठली. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा चार महिन्यानंतर मृत्यू झाला. आता गुजरातच्या ग्राहक विवाद निवारण आयोगाने रुग्णालय प्रशासनाला मृत रुग्णाच्या कुटुंबियांना ११.२३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

खेडा जिल्ह्यातील वांघ्रोली येथील देवेंद्रभाई रावल यांना पाठदुखी आणि लघूशंकेसाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांनी बालसिनोर येथील केएमजी रुग्णालयातील डॉ. शिवूभाई पटेल यांच्यासोबत उपचारांसाठी संपर्क साधला. मे २०२१ मध्ये त्यांच्या किडनीमध्ये १४ मिमीचा मूतखडा असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. यावेळी त्यांनी चांगले उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी त्यांनी शस्त्रक्रिया करुन मूतखडा काढण्याला पसंती दिली. यानंतर सप्टेंबर २०११ मध्ये त्यांच्या किडनीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या चुकीमुळे मूतखड्याऐवजी किडनी बाहेर काढल्य़ाचे कुटुंबियांच्या लक्षात आले.

कुटुंबियांना हा प्रकार ऐकून मोठा धक्का बसला. यावेळी रुग्णाला लघूशंकेवेळी आणखी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना किडनी स्पेशल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी त्यांना अहमदाबाद येथील आयकेडीआरसी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्या रुग्णालयातच उपचारांदरम्यान ८ जानेवारी २०१२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

देवेंद्र भाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित रुग्णालयालविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहचले. न्यायालयाने संबंधित रुग्णालयाला यात दोषी असल्याचे जाहीर केले. तसेच संबंधिक रुग्णालयाने मृत्यू रुग्णाच्या कुटुंबियांना ११.२३ लाख रुपये नुकसाना भरपाई देण्याचे आदेश दिले.


मुलांच्या चुकीची शिक्षा पालकांना भोगावी लागणार, चीनमध्ये नवा कायदा