नालासोपाऱ्यातून १४०० कोटींचे मॅफेड्रोन जप्त, पाच अटकेत; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) नालासोपाऱ्यातून मॅफड्रोनचा (एमडी) मोठा साठा जप्त केला असून पाच जणांना अटक केली आहे. ७०३ किलो वजानाचे मॅफेड्रोन असून त्याची किंमत सुमारे १४०० कोटी रुपये आहे, अशी माहिती एएनसीचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी दिली.

 

नालासोपाऱ्यात एमडी बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार एएनसीने नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगर येथे छापा टाकला. तेव्हा तिथे एमडी तयार करण्याचा कारखाना आढळला, असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी चौघांना यापूर्वीच मुंबईतून अटक करण्यात आली होती. तर, या कारवाई दरम्यान नालासोपाऱ्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली. अलीकडच्या काळात एएनसीने केलेल्या मोठ्या कारवाईपैकी ही एक कारवाई आहे.