घरक्राइमकिरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या, डोंबिवली रेल्वे परिसरातील घटना

किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या, डोंबिवली रेल्वे परिसरातील घटना

Subscribe

डोंबिवली रेल्वे परिसरात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली ९० फिट रोडवरून रिक्षातून जात असताना या दोन्ही मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात बेचनप्रसाद चौहान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डोंबिवली टिळक नगर पोलीस व रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासादरम्यान चोरीचा उद्देशाने ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र या घटनेतील बबलू चौहान या मित्राची अधिक चौकशी केली असता त्यानेच मित्र बेचनप्रसाद चौहानचा खून केल्याचे उघड झाले आहे. डोबिंवलीतील शेलारनाका परिसरात बेचन प्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे दोघं मित्र भाड्याने राहत होते. दोघेही मुळचे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. डोंबिवलीमध्ये ते फर्निचर बनवण्याचे काम करायचे.

अधिक माहितीनुसार, बेचन प्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे दोघं मित्र काल रात्री दीडच्या गाडीने कल्याण रेल्वे स्थानकाहून उत्तरप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. यावेळी शेलारनाका परिसरातून त्यांनी साडे बाराच्या सुमारास रिक्षा पकडली. बेचेन आणि बबलू चौहान दोघेही दारु पिऊन होते. रिक्षातून जात असतानाही ते एकमेकांशी भांडत होते. यावेळी रिक्षा चालकास हे दारु पिऊन असल्याचे समजल्याने रिक्षा चालकाने त्यांनी रिक्षातून खाली उतरवले. पुढेही दोघांमधील भांडण अधिकचं वाढले. यावेळी बबलू प्रसाद चौहान याने आपला मित्र बेचेन चौहान याला जीवे ठार मारले. आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास डोंबिवलीतील रेल्वे पटरीवर फेकून दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी मित्र बबलूने मयत मित्र बेचेनच्या डोक्‍यावर आणि शरीरावर गंभीर घाव घालत चेंदामेंदा केला होता. पोलिसांना या दोघांच्या बॅग आणि मोबाईल रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्या आहेत.

- Advertisement -

मात्र हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपी बबलू चौहानने चोरीचा बनाव रचला होता. त्याने सोमवारी सकाळी शेलार नाका येथील घरी पोहचत रचलेला चोरीच बनाव भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितला.यावेळी आरोपीने सांगितले की, एका अनोळखी इसमानी त्यांची रिक्षा अडवून रिक्षा चालकास पळवुन लावले. त्यानंतर बेचेन आणि आरोपी बबलूला चाकूच्या धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करून शेजारील ठाकुर्ली रेल्वे ट्रॅकवर नेले. तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. यात बबलूने आरोपीच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून तेथून पळ काढला. मात्र बेचेन हा त्यांच्या तावडीत सापडला आणि त्याची निघृण हत्या केली असे सांगितले. याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत रेल्वे पोलीस आणि टिळकनगर पोलीस घेऊन तपास चालू केला. मात्र तपासात वरील कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी बबलू प्रसाद चौहान यानेच मित्र बेचेन चौहानची हत्या केल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले.

याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गु.र. नंबर ९९/२०२१ कलम ३०२, २०१ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी आरोपी बबलू प्रसाद चौहानविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून आज दुपारी आरोपीला कोर्टासमोर हजर केले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -