मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र मुंबईच्या दिंडोशीत एक किसळवाणा प्रकार समोर आला आहे. दिंडोशी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या 78 वर्षीय वृद्ध महिलेला डिमेंशिया आणि विस्मरणाचा आजार आहे. या गोष्टीचा फायदा घेत एका 20 वर्षीय तरुणाने सदर महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे. (Elderly woman sexually assaulted in Mumbai taking advantage of illness)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला ही घरात एकटीच होती. या महिलेला विस्मरणाचा आजार आहे. त्यामुळे तिच्या घरी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. महिलेला एकटी असल्याचे पाहून 20 वर्षीय आरोपी प्रकाश मोरिया हा महिलेच्या घरात शिरला. त्यावेळी महिला तिच्या रुममध्ये झोपली होती. आरोपीने पीडित महिला झोपल्याचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा – Madras HC : कार्यालयातील नकोसे वर्तनसुद्धा लैंगिक छळच, मद्रास हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण
या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश मोरिया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम तैनात केल्या. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटनेप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहोत.
एकाच दिवशी अत्याचाराच्या आणखी दोन घटना
दरम्यान, आज लैंगिक अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनांनी मुंबईतून समोर येत आहेत. पहिल्या घटनेत मुंबईच्या मालाड परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या व्हायरल केल्याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत कांदिवलीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला भेटायला बोलवून तिच्याच तीन मित्रांनी आळीपाळीने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हेही वाचा – raped in mumbai : मोठी बातमी! मुंबईतील राम मंदिर स्थानक परिसरात 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार