मुंबई : मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचा स्वप्नं असतं. यासाठी प्रत्येकजण पैसे जमवण्याचा प्रयत्न करताना दिसतो, पण पैसे जमले नाही तर त्यांचं स्वप्नं अधूरं राहतं. अशाच एका व्यक्तीने मुंबईत घर खरेदी केले, पण उर्वरीत पैसे तो जमवू शकला नाही. त्यामुळे त्यांने दरोड्याची कहाणी रचली. मात्र पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो पकडला गेला. (Failed to collect money to buy a new house in Mumbai fake robbery story But)
हेही वाचा – आईचे नाव सातबाऱ्यावर लावण्यासाठी मागितली लाच, मंडल अधिकारी अन् पंटर ‘एसीबी’च्या जाळ्यात
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, अंधेरी पूर्वला राहणाऱ्या अजित पटेल याने त्याला लुटल्याची तक्रार दाखल केली. त्याला एका दुचाकीस्वाराने लुटल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यानुसार आम्ही ही घटना घडली तिथले आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र आम्हाला त्यात अशी कोणतीही घटना दिसली नाही. त्यामुळे आम्हाला अजित पटेल आणि त्याच्या साथीदारावर संशय आला. त्यानुसार आम्ही अजित पटेल आणि त्याच्या साथीदाराची चौकशी सुरू केली.
दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता दारोड्याच्या घटनेबाबत त्यांच्या जबाबात एकसूत्रता नव्हती. तांत्रिक साहाय्याने दरोडा नसल्याचे आम्हाला आढळुन आले. त्यामुळे आम्ही अजित पटेल आणि त्याच्या साथीदाराला घटनास्थळी नेऊन पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी अजित पटेलच्या लक्षात आले, आपण पकडले गेलो आहोत. त्याने आम्हाला सर्व हकीकत सांगितली आणि दरोडा पडला नसल्याची कबुली दिली.
हेही वाचा – फ्लाइट अटेंडंटचा विनयभंग करणारा बांगलादेशी तरुण जेरबंद; मस्कत-ढाका विमानातील प्रकार
पोलिसांनी सांगितले की, अजितसोबत असलेला दुसरा व्यक्ती त्याचा ड्रायवर आहे. अजित पटेल याने मुंबईत घर विकत घेतले. पण या घराचे 35 लाख रुपये वेळेत जमवण्यास तो अयशस्वी ठरला. घराचे पैसे देण्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ मिळावा यासाठी त्याने आपल्या दरोड्याची कहाणी रचली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी करत आहेत.