घरक्राइमरिक्षाचालकाकडून 28 रुपये घेण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू, आता कुटुंबाला मिळाले 43 लाख

रिक्षाचालकाकडून 28 रुपये घेण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू, आता कुटुंबाला मिळाले 43 लाख

Subscribe

23 जुलै 2016 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास चेतन विमानतळावरून रिक्षाने विक्रोळी पूर्वेकडील त्याच्या घरी परतत होता. घराजवळ आल्यावर त्याने रिक्षाचालकाला  172 रुपये भाड्याचे देण्यासाठी 200 रुपये दिले. रिक्षाचालकाने आपल्याकडे सुट्टे २८ रुपये नसल्याचा दावा करत पैसे देण्यास नकार दिला आणि रिक्षा सुरू करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत 2016 मध्ये एका रस्ते अपघातात (road acciden) आपला जीव गमावलेल्या 26 वर्षीय तरुणाच्या कुटुंबाला 43 लाख रुपयांची नुकसान भरपाई (compensation) मिळाली आहे. एका रिक्षाचालकाने (rickshaw)  28 रुपये देण्यास नकार दिल्याने या तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. त्याच्या कुटुंबाला आता नुकसान भरपाईपोटी 43 लाख रुपये मिळाले आहेत.

एका सॉफ्टवेअर फर्मचा कर्मचारी चेतन आचिर्णेकर (Chetan Achirnekar) याने 172 रुपयांच्या भाड्यासाठी रिक्षाचालकाला 200 रुपये दिले होते. चेतनने उर्वरित पैसे मागितले असता रिक्षाचालकाने पैसे न देता पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या अपघातात रिक्षा चेतनच्या अंगावर पडली. यामध्ये चेतनचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या वडिलांनी हा अपघात पाहिला. यानंतर चेतनच्या कुटुंबियाने फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे (Future General India Insurance Company) विम्याचे पैसे मिळण्यासाठी दावा केला. मात्र, विमा कंपनीने हा मृत्यू अपघात नसल्याचा दावा करत विमा दावा नाकारला.  हे हत्येचे प्रकरण असून विमा कंपनी जबाबदार नाही, असे या कंपनीने म्हटले. याविरोधात या कुटुंबाने मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाकडे (Motor Accident Claims Tribunal) अपील केले.

- Advertisement -

मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्सचा दावा नाकारला. न्यायाधिकरणाने मृत्यू प्रमाणपत्र आणि शवविच्छेदन अहवालात नोंद केली की चेतनचा मृत्यू मोटार वाहन अपघातात झालेल्या जखमांमुळे झाला. ए.एम.चांदेकर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकरणाने सांगितले की,ज्या पद्धतीने हा अपघात झाला त्यावरून हे स्पष्ट होते की, रिक्षा चालकाला तरुणाला अपघातातून वाचवण्याची संधी होती. चेतन आचिर्णेकर यांचा रिक्षाचा पाठलाग करताना मृत्यू झाल्याप्रकरणी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने त्याचे आई-वडील गणपत आणि स्नेहा आचिर्णेकर आणि लहान भाऊ ओंकार यांना द्यावयाच्या भरपाईची गणना करताना मासिक १५ हजार रुपये देण्याचा निकाल दिला. तसेच चेतनच्या पगाराचाही विचार केला. मृत्यूसमयी चेतन एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करत होता. विमा कंपनी आणि रिक्षा मालक कमलेश मिश्रा यांना 43 लाख रुपयांची भरपाई (व्याजासह) संयुक्तपणे द्यावी लागेल, असा निर्णयही न्यायाधिकरणाने दिला.

चेतनच्या कुटुंबाने डिसेंबर २०१६ मध्ये न्यायाधिकरणासमोर आपला दावा सादर केला होता. त्यांनी सांगितले की, 23 जुलै 2016 रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास चेतन विमानतळावरून रिक्षाने विक्रोळी पूर्वेकडील त्याच्या घरी परतत होता. घराजवळ आल्यावर त्याने रिक्षाचालकाला  172 रुपये भाड्याचे देण्यासाठी 200 रुपये दिले. रिक्षाचालकाने आपल्याकडे सुट्टे २८ रुपये नसल्याचा दावा करत पैसे देण्यास नकार दिला आणि रिक्षा सुरू करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेतनने त्याला थांबण्यास सांगितले असताना त्याने वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. चेतनने रिक्षाचा पाठलाग केला असता यावेळी अपघात होऊन रिक्षा पलटी  झाली आणि चेतनवर कोसळली. यामध्ये चेतन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

- Advertisement -

चेतनच्या मृत्यूमुळे त्यांचे मानसिक आणि आर्थिक असे दोन्ही नुकसान झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. रिक्षाचा मालक न्यायाधिकरणासमोर हजर झाला नाही. तसेच विम्याचा दावा नाकारण्यासाठी विमा कंपनीने युक्तीवाद केला की, घटनेच्या वेळी रिक्षाचालकाकडे वैध ड्रायव्हिंग परवाना नव्हता. मात्र, विमा कंपनीने हा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही तोंडी किंवा कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही, असे म्हणत न्यायाधिकरणाने कंपनीचे दावा फेटाळत चेतनच्या कुटंबियांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -