७३ वर्षीय सासऱ्याने धमकावत सुनेवर केला बलात्कार

Rape Case

कोल्हापुरात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इचलकरंजीत सासऱ्याने सुनेला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी ७३ वर्षीय सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात  खळबळ माजली आहे. इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या कबनूर येथील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली.

७३ वर्षीय सासऱ्याने सुनेला तुझं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम असल्यां मुलाला सांगेन अशी धमकी दिली. त्यानंतर सुनेवर त्याने बलात्कार केला. १६ आणि १८  ऑक्टोबरला धमकी देत बलात्कार केला. पीडित सुनेने शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली. महम्मद बागवान असं या आरोपी सासऱ्याचं नाव आहे.

आरोपी महम्मद बागवान याने सुनेला तुझं दुसर्‍या व्यक्तीबरोबर प्रेमप्रकरण असल्याचे मुलाला सांगण्याची धमकी देत बलात्कार केला. दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. Creत्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबतची माहिती सहपोलीस निरीक्षक प्रमोद मगर यांनी दिली.