क्वारंटाईनच्या भीतीने वडिलांच्या मृतदेहासोबत मुलींनी ४ दिवस अगरबत्ती लावून काढले, एकीची आत्महत्या

मृतदेहाच्या बाजूला सुगंधित धुप आणि अगरबत्ती लावून ठेवली होती.

Fearing Quarantine, the girls hide their father's body and one of them committed suicide
क्वारंटाईनच्या भीतीने वडिलांच्या मृतदेहासोबत मुलींनी ४ दिवस अगरबत्ती लावून काढले, एकीची आत्महत्या

मुंबईतील विरार शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलींनी त्यांच्या मृतदेहाला घरामध्ये कैद करुन ठेवलं असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल चार दिवस त्यांनी वडिलांचा मृतदेह घरामध्ये लपवून ठेवल्याचे कबूलं केलं आहे. 1 ऑगस्ट रोजी वडिलांचे निधन झाले होते. पण ही माहिती इतर कोणालाही कळू न देता मृतदेहाच्या बाजूला सुगंधित धुप आणि अगरबत्ती लावून ठेवली होती. तसेच एका मुलीने समुद्रामध्ये जीव दिला असून दुसरी मुलगी सुद्धा आत्महत्या करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तरुणीला आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता तिने संपुर्ण घटनेचा उलगडा केला.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार तिची आई एका विक्षिप्त आजाराने ग्रस्त आहे. तसेच संपुर्ण घर वडिलांच्या पेन्शनवर चालायचे. आम्हा दोघांचे अद्याप लग्न झाले नाहीये.तसेच तिच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. यामुळे आंम्हाला सुद्धा आता कोव्हिड केयर सेंटर मध्ये दाखल करण्यात येईल या भीतीपोटी आम्ही वडिलांचा मृत्यू झाल्याचे कोणाला सांगितले नाही. तसेच गेल्या चार दिवसापासून वडिलांना रुममध्ये बंद करुन ठेवलं आहे.

हा धक्कादायक प्रकार विरार वेस्टमधील गोकुळ टाऊनशिप परिसरातील अग्रवाल ब्रुकलीन पार्क या इमारतीत घडला आहे. सध्या पोलिस घटनेची संपूर्ण चौकशी करत असून आत्महत्या पासून परावृत्त करण्यात आलेल्या तरुणीला तसेच तिच्या आईला मदत करत आहे. तसेच पोलिसांनी वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आणि पुढील तपासाकरीता पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.


हे हि वाचा – धक्कादायक! काकडी घेतल्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण