घरक्राइमFemale Judge Suicide : महिला न्यायाधीशाने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या; काँग्रेसचा...

Female Judge Suicide : महिला न्यायाधीशाने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या; काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा

Subscribe

"देशाची कर्तबगार कन्या सरकारी यंत्रणेला बळी पडली", अशी टीका काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी योगी सरकारवर केली आहे.

बदायू : उत्तर प्रदेशाच्या बदायू शहरातील एका महिला न्यायाधीशाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या महिला न्यायाधीशाचे नाव ज्योत्सना राय नाव असून तिचे वय 29 वर्ष होते. या महिला न्यायाधीशाने सिव्हील बार येथील शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घरचा दरवाजा तोडून महिला न्यायाधीशाचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांना घटनास्थळी सुसाईट नोट सापडली आहे. ‘कर्तबगार कन्या सरकारी यंत्रणेला बळी पडली’, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्वीट करत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गेली आहे.

या महिला न्यायाधीश ज्योत्सना यांच्या निवासस्थानी काम करणारा कर्मचारी सकाळी आला होता. पण कर्मचाऱ्याने ज्योत्सना यांना आवाज देऊनही त्यांनी दरवाजा उघडला नाही. यानंतर कर्मचाऱ्याने स्थानिक पोलीस आणि न्यायालय परिसरातील कर्माचाऱ्यांना बोलवले. यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी ज्योत्सनाने घरात फाशी घेल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर सुसाईट नोटही सापडली.

- Advertisement -

हेही वाचा – Raut On Advani : “अडवाणींना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी…”, संजय राऊतांची खंत

ज्योत्सना ही 24 व्या वर्षी ज्युनियर डिव्हीजन न्यायाधीशची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. यानंतर 15 नोव्हेबर 2019 रोजी त्यांची पहिली पोस्टींग अयोध्या येथे झाली होती. यानंतर अयोध्ये येथून बदली होऊन ज्योत्सना एप्रिल 2023 मध्ये बदायुला आल्या होत्या. ज्योत्सना या मूळ मऊ जिल्ह्यातील रहिवाशी असून त्यांचे वडिलही सरकारी अधिकारी होते. ज्योत्सनाच्या वडिल हे बदायू येथूनच सेवानिवृत्त झाल्यानंतर लखनौमध्ये स्थायिक झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Aaditya Thackeray : शिंदे सरकारच्या सर्व पॉलिसी सूटबुटातील लोकांसाठी; रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरे कडाडले

अलका लांबाची सरकारी यंत्रणेवर निशाणा

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्वीट करत ज्योत्सनाच्या आत्महत्येकडे सर्वा लक्ष वेधले. या ट्वीटमध्ये अलका लांबा म्हणाल्या, “देशाची कर्तबगार कन्या सरकारी यंत्रणेला बळी पडली”, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -