घरक्राइमबोगस नोटा बनवून विक्री करणार्‍या चौघांना अटक; ३५ लाख ५४ हजारांच्या बोगस...

बोगस नोटा बनवून विक्री करणार्‍या चौघांना अटक; ३५ लाख ५४ हजारांच्या बोगस नोटा जप्त

Subscribe

बोगस नोटा तयार करुन त्याची विक्री करणार्‍या चार जणांच्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे.

बोगस नोटा तयार करुन त्याची विक्री करणार्‍या चार जणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अब्दुल्ला कल्लू खान, महेंद्र तुकाराम खंडास्कर, अमीन उस्मान शेख, फारुख रसुल चौधरी अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या ३५ लाख ५४ हजार रुपयांच्या बोगस नोटा तसेच बोगस नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईसह पालघरच्या वाडा परिसरात कारवाई

विक्रोळी येथील पूर्व दुतग्रती महामार्ग, प्रविण हॉटेलजवळ काहीजण तरुण बोगस नोटांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी तिथे अब्दुल्ला आणि महेंद्र हे दोघेही आले. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना २ लाख ८० हजार रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. त्यांच्या चौकशीत त्यांचे इतर दोन सहकारी पालघरच्या वाडा परिसरात राहत असून ते त्यांच्या राहत्या घरी बोगस नोटा बनवित असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून अमीन आणि फारुख या दोघांना अटक केली.

- Advertisement -

३५ लाख ५४ हजारांच्या बोगस नोटा जप्त

या कारवाईत पोलिसांनी ६ लाख २० हजार रुपयांच्या दोनशेच्या ३१० नोटा, २१ लाख ८ हजार ५०० रुपयांच्या पाचशेच्या ४ हजार २१७ नोटा, ४ लाख ५५ हजार २०० रुपयांच्या दोनशेच्या २ हजार २७६ नोटा आणि ३ लाख ७० हजार ३०० रुपयांच्या शंभरच्या ३ हजार ७०३ बोगस नोटा जप्त केल्या. या नोटासह बोगस नोटा बनविण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर, स्कॅनर, पेपर, इंक बॉटल आदी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बोगस नोटांची छपाई करुन त्याची बाजारात विक्री करुन भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या चौघांविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच त्यांनी आतापर्यंत किती बोगस नोटांची छपाई करुन त्याची बाजारात विक्री केली आहे याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – मुलाने रचला आईच्या बॉयफ्रेंडच्या अपहरणाचा मास्टर प्लॅन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -