घरक्राइमविना पासपोर्ट वास्तव्य करणाऱ्या १४ नायजेरियन नागरिकांना अटक

विना पासपोर्ट वास्तव्य करणाऱ्या १४ नायजेरियन नागरिकांना अटक

Subscribe

नालासोपारा शहरातून १४ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट आणि राहण्यासाठीचा विजाची आवश्यकता असते. मात्र, नालासोपारा हद्दीत नायजेरियन व्यक्ती बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे तुळिंज पोलिसांनी शोध मोहिम करत मंगळवारी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात धडक कारावाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने तुळिंज पोलिसांनी विदेशी व्यक्ती पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

१६ जण आले आढळून

नालासोपारा शहरात नायजेरियनचा अड्डा बनल्याबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नायजेरियन नागरिकांचा शोध घेण्यात आला. या दरम्यान, १६ नागरिक आढळून आले. मात्र, यातील दोन नायजेरियन व्यक्तीकडे पासपोर्ट आणि कागदपत्रे आढळली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही. मात्र, इतर १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, नालासोपाऱ्यामधील पूर्वेकडील प्रगतीनगरच्या एचपी अपार्टमेंटच्या सदनिका नंबर १०९ची तुळिंज पोलिसांनी झडती घेतली. या झडतीच्या वेळी किचन रुममधील रॅकमध्ये बेकायदा विनापरवाना बेकायदेशीर विक्रिसाठी २४ हजार ६९५ रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्या पोलिसांना सापडल्या. याप्रकरणी पोलिसांनी त्या घरातील ५० हजारांचा मुद्देमाल आणि दारू जप्त केली आहे. पोलीस शिपाई संदीप दराडे यांनी तुळिंज पोलीस ठाण्यात नायजेरियन इब्राहिम अद्दु निंग (५६) आणि महिला ब्लेशिंग इगो खान (३१) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नायजेरियन नागरिकांची यादी

ऑबे टिकेचुकू अगस्तीन (२७), ओलोरोण्डा देगी (३०), फ्रायडे इडोको चिनेचिविंग (३८), मलाची ओगबोना नगोके (४०), उचे जॉन इमेका (४७), अलिराबाकी आयदा (२७), इथेल नकुला यू (३२), एनव्हेके ख्रिस्तोफर ओन्कोवो (४४), ओकेके ओबिनो केनेथे (३३), ओकोरो लुके उकूउ (२८), सरगंला ऍबीट्रने (२४), जेम्स चुकवाजी (५४), चुकून जेक्युआय ओकोरजी (४०) आणि याओ आमिद (२६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अर्णब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा – बाळासाहेब थोरात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -