Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम प्रेमात मिळाला नकार, मुलीने देवीच्या दारात जाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमात मिळाला नकार, मुलीने देवीच्या दारात जाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

गावाजवळ असलेल्या संतोषी मातेच्या मंदिरात मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडवली. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Story

- Advertisement -

प्रेम विवाह करणे ही आजकालची फॅशन झाली आहे. प्रेमात नकार मिळाल्यावर तरुण तरुणी टोकाचे पाऊल उचल्याच्या अनेक धक्कादायक घटना सतत समोर येत असतात. पालघर डाहाणू येथून एक असाच प्रकार समोर आला आहे. मुलाने लग्नाला नकार दिल्याने मुलीने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावाजवळ आसलेल्या संतोषी मातेच्या मंदिरात जाऊन मुलीले विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गावाजवळ असलेल्या संतोषी मातेच्या मंदिरात मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडवली. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मात्र मुलगी सुखरुप असल्याने त्यांना दिलासा मिळाला.

एका युवतीने आशागड येथील संतोषी माता मंदिर परिसरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे एका मुलासोबत चार वर्षापासून प्रेमसंबंध होते. मुलीने तिच्या प्रेमाची आईला कल्पना दिली. मुलाच्या आईने लग्नासाठी मुलीला दोन वर्षे थांबण्याचा सल्ला दिला. मुलीने ही ते मान्य करून दोन वर्षे वाट पाहिली परंतु त्यांनतर देखील मुलाकडून काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर तसेच लग्नाचा तगादा लावत असल्यामुळे मुलाने तिला लग्नाला नकार दिला आणि प्रेम संबंध तोडण्याचा प्रयत्न केला व धक्क्यामुळे मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने मुलगी बचावली असून डहाणू कॉटेज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून सासरच्यांनी मुलीला सून म्हणून नकारले, प्रेमी युगुलांनी आपले आयुष्यचं संपवले

 

- Advertisement -