Homeक्राइमGodhra : गोध्रा रेल्वे घटनेतील जामीनावरील आरोपीला पुण्यातून अटक, चोरीचा गंभीर आरोप

Godhra : गोध्रा रेल्वे घटनेतील जामीनावरील आरोपीला पुण्यातून अटक, चोरीचा गंभीर आरोप

Subscribe

2002 साली झालेल्या गोध्रा रेल्वे हत्याकांडातील दोषी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (55) याला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. 2.49 लाख रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरण्याच्या आरोपाखाली पुण्यातून सलीम याला पोलिसांनी अटक केली.

पुणे : 2002 साली झालेल्या गोध्रा रेल्वे हत्याकांडातील दोषी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (55) याला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. 2.49 लाख रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरण्याच्या आरोपाखाली पुण्यातून सलीम याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असताना पोलिसांनी या घटनांमध्ये एक आंतरराज्यीय टोळी सहभागी असल्याचे आढळून आले. (Godhra train carnage case convict arrested in pune in theft case was absconded after jumped parole)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पुण्यातील जुन्नर येथून सात जानेवारी रोजी एका ट्रकमधून सुमारे 2.49 लाख रुपयांचे टायर आणि ट्यूब चोरीला गेले. चोरी झाल्याचं समजताच ट्रक चालक सोमनाथ गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. एफआयआरमधील तक्रारीनुसार, पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानुसार, नाशिकमध्येही असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं. त्यानंतर 22 जानेवारी रोजी पोलिसांनी नाशिकमधून पाच जणांना अटक केली.

या पाच जणांमध्ये सलीम जर्दा असल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सलीम जर्दासह त्याचे सहकारी साहिल पठाण, सुफियान चानकी, अयुब सुंथिया, इरफान दरवेश यांनाही अटक केली आहे. या पाच जणांना अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून एक टेम्पो ट्रक आणि चोरीचा मालही जप्त केला आहे. चोरट्यांकडून जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे 14.4 लाख रुपये आहे.

दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना गोध्रा टोळीबद्दलही माहिती मिळाली. त्यानुसार, गोध्रा घटनेत दोषी ठरल्यानंतर सलीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु गतवर्षीत सप्टेंबरमध्ये सलीम जर्दाला जामीन मिळाला होता. तसेच, जामीनानंतर सलीम फरार झाला होता. गोध्रा घटनेत जर्दासह 11 जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच, उर्वरित 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने जर्दासह 11 जणांची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेत बदलली.


हेही वाचा – हर हर महादेव! ट्रेन, विमान फूल, कुंभ मेळ्यातील स्नानासाठी मुंबईकर पट्ट्या निघाला थेट दुचाकीवर