घरक्राइमहेअरबँडमधून सोन्याची तस्करी, मंगळुरु विमानतळावर एकाला अटक

हेअरबँडमधून सोन्याची तस्करी, मंगळुरु विमानतळावर एकाला अटक

Subscribe

देशात सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यात सोने तस्करी करण्यासाठी तस्कर विविध शक्कल लढवत आहेत. विविध देशांतून सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या तस्करीसाठी नवे नवे मार्ग शोधून एजन्सींना चकवा देण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तस्करांच्या नव्या पद्धती आणि प्रयत्नांना एजन्सी वारंवार खोट्या ठरवत आहेत. यातच मंगळुरु विमानतळावरून चक्क हेअरबँडमधून सोन्याची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सोन्याची तस्करीप्रकरणी मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने एका व्यक्तीला अटक केली आहे. तस्करीची ही पद्धत अनोखी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दुबईहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट क्रमांक IX 384 मधून ही सोने तस्करी करणारी व्यक्ती मंगळुर विमानतळावर आली होती. यावेळी त्या व्यक्तीवर संशय आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, त्या व्यक्तीजवळील केसांच्या हेअरबँडवर सोने लपवल्याचे उघड झाले. या व्यक्तीने चक्क हेअरबँडमध्ये बसवलेल्या मण्यांच्या आतमधून सोन्याच्या तारा लपवल्या होत्या. याप्रकरणी कस्टम विभागाने शनिवारी मंगळुरु विमानतळावरून अटक केली आहे. या व्यक्तीकडून ११५ ग्रॅम वजनाच्या हेअरबँडमधून तब्बल ५ लाख ५८ हजार रुपये किंमतींचे सोने जप्त करण्यात आले.   सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, सोन्याची पुनर्प्राप्ती कमी असू शकते. परंतु तस्करी करण्यासाठी ही नवी पद्धत वापरी आहे.


राशीभविष्य: सोमवार २३ ऑगस्ट २०२१


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -