घरक्राइमगोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सुनावणी 5 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली

गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सुनावणी 5 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली

Subscribe

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी 27 तारखेला कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी पार पडली. कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच या प्रकरणी कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींपैकी तीन आरोपींना कोर्टात हजर केले. मात्र, सर्व आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्यावी, अशी विनंती संशयित आरोपींच्या वकिलांनी केली. यानंतर पुढील सुनावणी 5 ऑगस्टला होणार आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोप निश्चितीची सुनावणी आज पार पडली. या सुनावणीसाठी आज संशयित आरोपी वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि जामिनावर असलेला समीर गायकवाड हजर होते. मात्र, सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सर्व आरोपी कोर्टात हजर केल्याशिवाय सुनावणी घेऊ नका. इतर संशयित आरोपींना प्रत्यक्ष हजर केल्यानंतरच आरोप निश्चितीची सुनावणी घ्या, अशी मागणी आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी केली. यानंतर कोर्टाने मागणीची दखल घेत पुढील सुनावणीसाठी पाच ऑगस्ट तारीख दिली.

- Advertisement -

सुनावणी दरम्यान वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मिळाव, अशी मागणी आरोपी वीरेंद्र तावडे याने केली. कोर्टाने त्याच्या मादणीची दखल घेतली. आता अटकेतील सर्व संशयित आरोपींना 5 ऑगस्टला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर केले जाणार आहे

काय आहे प्रकरण – 

- Advertisement -

कामगारासाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ हल्ला झाला होता. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निंग वॉक करून घरी परतत होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचारीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. पानसरे यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार करण्यात आला. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी उपचारादम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -