Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमHimani Narwal murder : हिमानी हत्या प्रकरणात एकाला अटक, पोलीस तपासात धक्कादायक माहिती...

Himani Narwal murder : हिमानी हत्या प्रकरणात एकाला अटक, पोलीस तपासात धक्कादायक माहिती…

Subscribe

सचिन असे आरोपीचे नाव असून तो बहादूरगडमधील खैरपूर गावचा रहिवासी आहे. 1 मार्च रोजी हरियाणातील रोहतकजवळील महामार्गावर एका सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह आढळला होता. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.

(Himani Narwal murder) चंदिगढ : काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे हरियाणा पोलिसांनी सांगितले. सचिन असे आरोपीचे नाव असून तो बहादूरगडमधील खैरपूर गावचा रहिवासी आहे. 1 मार्च रोजी हरियाणातील रोहतकजवळील महामार्गावर एका सुटकेसमध्ये हिमानीचा मृतदेह आढळला होता. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. (Accused Sachin killed due to blackmailing)

आरोपी सचिनचा फोन जप्त करण्यात आला असून आम्ही सायबर आणि एफएसएल यांची मदत घेत आहोत. आम्ही प्रत्येक अँगलने तपास करत असल्याचे सांपला डीएसपी रजनीश कुमार यांनी सांगितले. आरोपी सचिन हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. हिमानी यांच्यासोबत त्याचे संबंध होते. हिमानी नरवाल त्याला कथितरीत्या ब्लॅकमेल करत होती आणि त्याच्याकडून लाखो रुपये उकळले होते, असे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तसेच, ज्या सूटकेसमध्ये मृतदेह सापडला तीदेखील हिमानी यांचीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Thackeray Vs Shinde : शिंदेंच्या अमृत काळातील भ्रष्ट व्यवहारांना स्थगिती, ठाकरेंचा हल्लाबोल

हरियाणातील काँग्रेस नेत्यांनी नरवाल यांचा उल्लेख, एक सक्रिय आणि समर्पित कार्यकर्ती असा केला आहे. त्या दशकभरापासून पक्षकार्याशी जोडलेल्या होत्या. त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेतही सहभाग घेतला होता. ती विधिचे शिक्षण घेत होती गेल्या एक दशकापासून पक्षाशी संबंधित आहे.

तर दुसरीकडे, हिमानी नरवालच्या कुटुंबाने तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. जोपर्यंत तिच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अल्पावधीतच नरवाल यांनी केलेल्या राजकीय प्रगतीमुळे काही काँग्रेस नेत्यांना त्यांचा हेवा वाटत होता, असा दावा कुटुंबीयाने केला आहे. तिच्या प्रगतीचा हेवा करू शकेल असे पक्षातील कोणीही असू शकते किंवा दुसरे कोणीतरी असू शकते, असे हिमान नरवाल यांच्या आई सविता यांनी सांगितले. विशेष म्हणजे, 12 वर्षांपूर्वी हिमानी यांच्या मोठ्या भावाची हत्या झाली होती. तर, 10 वर्षांपूर्वी वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हिमानी सहा वर्षांपूर्वी तिच्या आई आणि धाकट्या भावासोबत दिल्लीला गेल्या होत्या. आता गेल्या पाच महिन्यांपासून त्या रोहतकमधील विजयनगर येथील आपल्या घरात एकट्याच राहात होत्या.

हेही वाचा – AAP : परिस्थिती बिकट! आपच्या कार्यालयाला तीन महिन्यांपासून टाळे, प्रदेशाध्यक्षांसह पदाधिकारी अनभिज्ञ