Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमHSRP Fraud : एचएसआरपीची बनावट Website; नागरिकांच्या खात्यातून पैसे वजा

HSRP Fraud : एचएसआरपीची बनावट Website; नागरिकांच्या खात्यातून पैसे वजा

Subscribe

वाहन चालवताना आता वाहतूक विभागाच्या नव्या नियमाचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार, सर्व वाहनचालकांना वाहतूक चालवण्यापूर्वी आपली नंबर प्लेट योग्य आहे का, हे पाहायची आहे. कारण राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.

HSRP Number Plate Cyber Frauds पुणे : वाहन चालवताना आता वाहतूक विभागाच्या नव्या नियमाचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार, सर्व वाहनचालकांना वाहतूक चालवण्यापूर्वी आपली नंबर प्लेट योग्य आहे का, हे पाहायची आहे. कारण राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. या वाहतुकीच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी वाहनचालकांची धावपळ सुरू आहे. पण या वाहनचालकांना सध्या फसवणुकीला सामोरं जावं लागलं आहे. (HSRP Number Plate Cyber Frauds fake website of hsrp deduct money from account report to cyber police)

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून पैसे लुटले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) तक्रारी होत आहेत. सायबर पोलीस ठाण्यातही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहनधारकांकडून नोंदणी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशात नागरिकांकडून संकेतस्थळांवर नोंदणी करण्यात येत आहे. दुचाकीसाठी 450 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाइन शुल्क भरताना अनेक संकेतस्थळे खुली झाल्याची माहिती धक्कादायक बाब उघडकीस ली आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांच्या बँक खात्यांमधून पैसे वजा होऊनही पैसे प्राप्त न झाल्याचा संदेश मिळत आहे. त्यामुळे एकाच व्यवहारासाठी पुन्हा एकदा पैसे भरण्यास सांगितले जात आहे.

ऑनलाइन व्यवहाराचे कुठलेच संदेश अथवा नोंदणीची माहिती ई-मेल किंवा मोबाइल क्रमांकावर प्राप्त होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढत आहे. काही जणांनी आरटीओ कार्यालयात धाव घेऊन बँक खात्यातून पैसे वजा झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, 23 फेब्रुवारीपर्यंत पुण्यातील 16 हजारांहून अधिक नागरिकांच्या वाहनांना पाटी बसविण्यात आली आहे. तसेच, 24 हजार नोंदणीधारकांनी वेळ घेतली असून, 80 हजारांहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती पुणे आरटीओकडून देण्यात आली.

‘आरटीओ’कडून पुणे शहरासह इतर 12 आरटीओ कार्यालयांसाठी रोजमार्टा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मुदतीचे दिवस कमी होत असताना वाहनधारकांकडून नोंदणी करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पुणे शहरात 25 लाखांहून अधिक जुने वाहनधारक असून, 23 फेब्रुवारीपर्यंत 80 हजार 604 वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 24 हजार 41 नोंदणीधारकांना वाहन तपासणीसाठी वेळ नियुक्त करण्यात आली आहे. तसेच, 16 हजार 454 वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवून घेतल्याची माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आज मिळणार फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता