घर क्राइम सलग दोन दिवस रायगडमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

सलग दोन दिवस रायगडमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

Subscribe

रायगड : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या अलिबाग तालुक्यातील थेरोंडा व मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्र किनारी एक कोटी रुपयांचे पंचवीस किलो अमली पदार्थ सापडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा किनाऱ्यांवर बुधवारी (ता. 30 ऑगस्ट) 11 बॅगा सापडल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा याच ठिकाणी मोठा अमली पदार्थाचा साठा सापडला आहे. यामुळे सलग दोन दिवस अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने धक्कायदाय घडना घडली आहे.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा रजि.नं. 1752023 एन.डी.पी.एस. अधिनियम 1985-8 (सी), 20 टक्के बी) (IT) (सी), 22(सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर, मुरूड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक निशा जाधव,रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे आदींनी भेट दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील कोर्लई गावच्या समुद्र किनारी मिळून आलेली प्लास्टिक पिशवीची पाकिटे त्यावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरुडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्या बाजूला इंग्रजीमध्ये असे लिहिलेलेव्ही त्याचे खाली इंग्रजी मध्ये AFGHAN PRODUCT असे लिहिलेले दिसत होते. या पाकिटावर उर्दू लिपीमध्ये छापील अक्षरे असलेली याणि वरील प्लास्टिकचे आवरणाच्या आतमध्ये नक्षीदार प्लास्टिक आवरण पाकीटावर इंग्रजीमध्ये LIMITED EDITION  आणि STARBUCKS HOLIDAY BLEND एकूण नऊ प्लास्टिक पिशवीची पाकिटे सापडली. यातील काही फाटलेल्या पाकिटमधून बाहेर येऊन तुकडे पडून वाळूमध्ये पसरलेला हिरवट काळसर रंगाचा पदार्थ असा 13.720 कि.ग्रॅम वजनाचा व 44,88,000 रुपये किमतीचा चरस नावाचा अमली पदार्थ असलेला मुद्देमाल मिळाला.

हेही वाचा – आता रेवदंडा किनारी सापडल्या अमली पदार्थांच्या 11 पिशव्या; पोलिसांकडून तपास सुरू

- Advertisement -

तसेच LONG GRAIN PARBOILED BIRYANI RICE PRIMIUM QUANIT SPECIALLY PACKED FOR PRODUCE OF PAKISTAN असे लिहीलेल्या दोन रिकाम्या गोणी, असा मुददेमाल सापडला. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील थेरोंडा गावचे हद्दीत समुद्र किनारी मिळून आलेली प्लास्टीक पिशव्याची पाकीटे त्यावर प्लास्टीक पिशवाची पाकीटे त्यावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरुडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्चा बाजुला इंग्रजीमध्ये AFGHAN PRODUCT असे लिहीलेले व त्याचे खाली इंग्रजीमध्ये असे लिहिलेले व त्याचे खाली इंग्रजीमध्ये 1150 GM असे लिहीलेली दिसत होते आणि पॉकीटावर उर्दु लिपीमध्ये काही छापील अक्षरे दिसली. या प्लास्टीकचे आवरण काढून आतमध्ये बघीतले असता आतमध्ये लालसर रंगाची नक्षीदार प्लास्टीक पिशवीची पाकीटीवर इंग्रजीमध्ये LIMITED EDITION व STARBUCKS HOLIYDAY BLEND लिहीलेले व सदर पिशवीवर पाठीमागील बाजुस इंग्रजी मध्ये STARBUCKS HOLIYDAY BLEND एकुण 9 प्लास्टीक पिशवीची पाकीटे त्यांत 11.188 कि.गॅम वजनाचा व 44,75,200 रुपये किमतीचा चरस नावाचा आमली पदार्थ असलेला असा एकूण 24.908 कि.गॅम वजनाचा व 99.63.200  रुपये किमतीचा चरस नावाचा अंमली पदार्थ असलेला मुददेमाल सापडला आहे.

हेही वाचा – आता श्रीवर्धन समुद्रकिनारी सापडली अमली पदार्थांची पिशवी; लागोपाठ घडतायेत घटना

कोकण विभाग अमली पदार्थाच्या विळख्यात

कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीनंतर तालुक्यातील हर्णे, कर्दे, तसेच गुहागर तालुक्यामध्ये समुद्रकिनारी पाण्यातून वाहत आलेली देखील यापूर्वी अशाच स्वरूपाची अमली पदार्थाची पाकिटे मिळून आली होती. आता रायगड जिल्ह्यामध्ये देखील समुद्र किनारी अशी पाकिटे सापडू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. रत्नागिरी समुद्रकिनारी अमली पदार्थांची पाकिटे सापडल्याने रायगड जिल्ह्यातदेखील सापडण्याची शक्यता पाहून जागरूक राहत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सागरी किनारी गस्त घालण्यास सुरुवात केली होती त्याचप्रमाणे समुद्रकिनारी अशी पाकिटे मिळण्याची शक्यता आहे. सापडल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी. स्वतःच्या फायद्यासाठी ही पाकिटे ठेवल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली होती.

रेवदंडा किनाऱ्यावर 11 बॅगा सापडल्या

श्रीवर्धन पाठोपाठ आता अमली पदार्थाच्या पिशव्या अलिबाग तालुक्यातील किनाऱ्यांवर सापडण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. 30 ऑगस्ट) रेवदंडा किनाऱ्यावर 11 बॅगा सापडल्या आहेत. त्याची मोजदाद करण्याचे काम पोलिसांतर्फे सुरु झालेले आहे. अधिक तपशील प्राप्त होऊ शकला नाही. मात्र, हे चरस आणखी कुठे कुठे वाहून गेले आहे. याबाबत साशंकता व्यक्त केली जात

- Advertisment -