घर क्राइम अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने चिरला पत्नीचा गळा; पुण्यातील खळबळजनक घटना

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने चिरला पत्नीचा गळा; पुण्यातील खळबळजनक घटना

Subscribe

कोरोनानंतर कुटुंब कलहाच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या कुटुंब कलहामागील कारणाचा शोध घेतला असता पैशांची चणचण आणि संशय ही दोन कारणे प्रामुख्याने समोर येतात.

पुणे : साफसफाईचे काम करणारा पती आणि धुनीभांडी करणारी पत्नी या दोघांच्या संसाररुपी वेलीवर मुलीच्या रुपाने फूलही उमलले. अशा या सुखी संसाराचा घात झाला तो एका संशयाने. पत्नीचे बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने चक्क तिचा गळाच चिरला. ही खळबळजन घटना 9 सप्टेंबर रोजी पुण्यात घडली. रुपाली उर्फ बबिता भोसले (35) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, आशिष भोसले (32) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.(Husband slashes wifes throat on suspicion of adultery Sensational incident in Pune Santnagar in Lohgaon)

पती पत्नीमधील वाद म्हणजे कुत्र्या मांजराचे भांडण असे सहजरित्या म्हटले जाते. आता भांडतील आणि नंतर एकत्र येतील असे हे नाते असते. मात्र, कोरोनानंतर कुटुंब कलहाच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या कुटुंब कलहामागील कारणाचा शोध घेतला असता पैशांची चणचण आणि संशय ही दोन कारणे प्रामुख्याने समोर येतात. अशाच संशयापोटी पुण्यात एक कुटुंबच उद्धवस्त झाल्याची घटना समोर आली आहे.

दीड वर्षापूर्वी झाले होते लग्न

- Advertisement -

पुण्यातील लोहगावमधील संतनगरमध्ये राहणाऱ्या रुपाली उर्फ बबिता भोसले आणि आशिष भोसले यांचा विवाह दीड वर्षापूर्वीच झाला होता. आशिष हा हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करत होता तर रुपाली धुनीभांडी करण्याचे काम करीत होती. यातूनच त्यांच्या कुटुबांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र मागील काही महिन्यांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आशिष वाद घालत होता. यादरम्यान त्यांने 9 सप्टेंबर रोजी वाद घालत रुपालीचा गळा चिरून तिचा खुन केला.

हेही वाचा : बबन घोलप यांचा उपनेतेपदाचा राजीनामा; आज उद्धव ठाकरेंशी चर्चा, राऊतांनी दिली माहिती

सात महिन्यांची मुलगी आली उघड्यावर

- Advertisement -

संशयामुळे पती आशिषने पत्नी रुपालीचा गळा चिरून खून केला. यामध्ये रुपाली यमसदनी गेली तर पती आशिष कारागृहात गेला. मात्र, या दोघाना सात महिन्यांची एक मुलगी असून, तिचे तर या घटनेमुळे आई-वडिलांचे छत्र हरलवे आहे. तेव्हा तिच्या पालनपोषणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : पालखी वाहायला कुणीच राहणार नाही; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

उपचारादरम्यान झाला रुपालीचा मृत्यू

नऊ सप्टेंबर रोजी झालेल्या वादात आशिष भोसले यांने रुपालीवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. ही बाब शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुपालीला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

आरोपीला पतीला तत्काळ अटक

घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. यानंतर आरोपी पती आशिष भोसलेला अटक करण्यात आली. विमानतळ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धामणे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -