Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र पती,पत्नीची मुलीसह आत्महत्या

पती,पत्नीची मुलीसह आत्महत्या

कर्जाला कंटाळून टोकाचे पाऊल; केडगावमधील घटना

Related Story

- Advertisement -

अहमदनगर येथील  केडगाव मध्ये  एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परंतु, व्यावसायिक कर्जाला कंटाळून आम्ही आत्महत्या करत असल्याचे लिहिले असल्याची चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोतवाली पोलिसांच्या माहितीनुसार, केडगावमधील मोहिनीनगर भागात राहणारे व्यावसायिक संदीप दिनकर फाटक (वय ४५), किरण संदीप फाटक (वय ३२) व मैथिली संदीप फाटक (वय १०) हे तिघे घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. सोमवारी शेजार्‍यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताचअपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरी क्षक सतीश शिरसाठ यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी सापडली आहेे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

अनेक दिवसांपासून होते विवंचनेत…
फाटक हे केडगाव देवी भागातील ठुबे मळ्यात अलीकडेच रहायला गेले होते. त्यांची केडगाव येथे सासूरवाडी असून त्यांचे कोंडीराम वीरकर हे सासरे होत. रात्री फाटक कुटुंबाचे नातेवाईकांशी दूरध्वनीवरून बोलणेसुद्धा झालेले होते. त्यात फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथ मिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
- Advertisement -

- Advertisement -