घरक्राइमपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; साखळी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन, पण...

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; साखळी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन, पण…

Subscribe

मुंबईपाठोपाठ पुणे सर्वाधिक लोकसंख्येचे आणि वर्दळीचे शहर. याच पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता.

पुणे : मागील तीन ते चार महिन्यांपासून पुणे या ना त्या प्रकरणाने चर्चेत राहत आहे. यामध्ये काहीच दिवसांपूर्वीचे ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरण हे पुण्यातीलच. तर ड्रग्ज प्रकरणा आधी पुण्यातच दोन दहशतवाद्यांना एनआयएच्या पथकाने अटक केली होती. आता पुन्हा एका दहशतवाद्यास अटक करण्यात आली असून, त्याच्या चौकशीतून अख्ख्या पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(Important news for Pune residents Terrorists plan to carry out chain bomb blasts but…)

मुंबईपाठोपाठ पुणे सर्वाधिक लोकसंख्येचे आणि वर्दळीचे शहर. याच पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. दरम्यान या कटाची गुप्त माहिती एनआयएला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोढव्यातू पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम याला अटक केली. त्याच्याविरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले जरी नसले तरी आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आलमची एनआयच्या पथकाने चौकशी केली असता त्याने पुण्यात साखली बॉम्बस्फोट करण्याच्या कटाबाबत एनआयएला माहिती दिली.यासाठी या सर्व दहशतवाद्याना साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचे आदेश सिरीयातून मिळाल्याची माहितीसुद्धा चौकशीतून समोर आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील विशेष न्यायालयात या दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र

एनआयएने आतापर्यंत मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) या दहशतवाद्यांविरुद्ध मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : रायगड जिल्ह्यात सुपारी संशोधन केंद्र उभारणार; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची घोषणा

- Advertisement -

या कलमान्वये आरोपपत्र दाखल

या सर्व दहशतवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘गहलोत खरोखरच जादूगार, सगळ्याच सुविधा गायब केल्या’; अमित शहा यांचा घणाघात

पुणे पोलिसांचे कौतुकच

जुलै महिन्यात दुचाकी चोरताना कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पुढे इसिसचे मॉड्यूल ओपन करण्यात एनआयएला यश आले. त्याबरोबरच पुणे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रासह देशातील मोठे दहशतवादी कृत्य टाळण्यात यश आल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएने) पुणे पोलिसांचे केलेल्या कामगिरीबाबत कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -