हैदराबाद : मुंबईच्या मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मनोज साने (56) याला सरस्वती वैद्य या आपल्या पार्टनरच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने जून 2023 रोजी विष देऊन तिची हत्या केली होती. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवायचा. तुकडे शिजवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. या घटनेबद्दल आजही चर्चा झाली तर अंगावर काटा येतो. अशातच आता हैद्राबादमधील एका माजी सैनिकाचे अमानवी कृत्य समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकाला अटक केली आहे. (In Hyderabad ex-soldier killed his wife and cooked her body parts in a cooker)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुमूर्ती हा लष्करातून सेवानिवृत्त झाला आहे. त्याचे 13 वर्षांपूर्वी मृत वेंकट माधवी (35) यांच्या लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. गुरुमूर्ती हा आपल्या कुटुंबासह जिलेलगुडा येथील न्यू वेंकटेश्वर नगर कॉलनीमध्ये राहतो. तसेच प्रकाशम जिल्ह्यातील जेपी चेरुवू येथील रहिवासी असून सध्या तो कंचनबाग येथे सुरक्षा गार्डची नोकरी करतो. 18 जानेवारी रोजी गुरुमूर्ती याने आपल्या सासऱ्यांसह त्याची पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. गुरुमूर्तीने सांगितले होते की, 16 जानेवारी रोजी सकाळी पत्नी आणि त्याचे जोरदार भांडण झाले होते. यानंतर वेंकट माधवी ही रागाच्या भरात घराबाहेर पडली होती आणि परतलीच नाही. मिरपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेंकट माधवी हीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – Saif Ali Khan : सैफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; मोहम्मद शहजाद अन् सीसीटीव्हीतील आरोपीचा चेहरा जुळेना
चौकशी केली असता वेंकट माधवी हिच्याबद्दल काहीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांना गुरुमूर्ती याच्यावर संशय आला. गुरुमूर्ती याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुरुमूर्तीने पोलिसांना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून आमच्या दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. वेंकट माधवी हिला संक्रांतीच्या सणासाठी आंध्र प्रदेशातील तिच्या मूळ गावी नांद्याल येथे जायचे होते. यावेळी तिची दोन्ही मुले आरोपीच्या बहिणीच्या घरी होते. वेंकट माधवी ही सणानिमित्त आपल्या माहेरी जाण्यासाठी आग्रही होती. मात्र गुरुमूर्ती याने विरोध केल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. याचदरम्यान, गुरुमूर्ती याने वेंकट माधवी हिची हत्या केली. यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवून तलावात फेकून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले.
हेही वाचा – Mumbai Crime : कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक, सात जणांना अटक