Homeक्राइमOnline Fraud : भोंदू बाबाने वृद्धेला ऑनलाइन घातला 29 लाखांचा गंडा, आरोपीचा...

Online Fraud : भोंदू बाबाने वृद्धेला ऑनलाइन घातला 29 लाखांचा गंडा, आरोपीचा शोध सुरू

Subscribe

पुण्यातही एका वृद्धेची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. मुलीवरची काळी जादू काढतो असे म्हणत भोंदू बाबाने ऑनलाइन लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : विज्ञानाचा जगभर कितीही प्रसार झाला असला तरीही भारतात लोक आजही भोंदू बाबांच्या नादी लागताना दिसतात. त्यामुळे देशासह राज्यातील अंधश्रद्धा कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. लोकांच्या याच भोळेपणाचा फायदा काही भोंदूबाबा नेहमीच घेत असतात. पुण्यातही एका वृद्धेची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. मुलीवरची काळी जादू काढतो असे म्हणत भोंदू बाबाने ऑनलाइन लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (In Pune a fraudster duped an elderly woman of Rs 29 lakhs)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत असलेल्या वृद्धेची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीने फोन केला होता. तुमच्या घरावर वास्तुदोष असून तुमच्या मुलीमधील दोषही काढून देण्याची बतावणी भोंदू बाबाने केली. तसेच घरावर आलेले संकट दूर करण्यासाठी काही पूजा कराव्या लागतील, असेही त्याने सांगितले. त्यामुळे पीडित महिलेला भोंदू बाबावर विश्वास बसला. तिने यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Crime : पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्येचा रचला बनाव, आरोपी पतीला अटक

वृद्धेला आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर भोंदू बाबाने त्याने तिला ऑनलाइन पद्धतीने पैसे देण्यास सांगितले. भोंदू बाबावर विश्वास बसल्याने पीडित महिनेही मागणीनुसार वेळोवेळी आरोपीच्या बँक खात्यात 28 लाख 77 हजार रुपये जमा केले. मात्र भोंदू बाबा दोष काढण्यासाठी काहीच उपाय करत नव्हता. त्यामुळे पीडिते महिलेने भोंदू बाबाला फोन करत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरून काही उत्तर आले नाही. त्यामुळे पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भोंदू बाबाचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा – Rakesh Rathod : बलात्कार प्रकरणी काँग्रेस खासदाराला अटक; पोलिसांनी पत्रकार परिषदेमधून उचलले