भयंकर! इन्टाग्राम मॉडेलने आईचं काळीज काढलं बाहेर

Instagram model kills mother

पूर्व यूरोपमधील मॉल्डोवा येथील २१ वर्षीय मॉडेल आपल्या आईची हत्या करत तिचे काळीज बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. एना लेकोविचने असे या मॉडेलचे नाव आहे. एनाने किचनमधील चाकूने तिच्या आईवर वार केले. एवढ्यावरच न थांबता तिने आईचे हृदय आणि अन्य अवयव शरीरापासून वेगळे केले. पोलिसांनी या प्रकरणी एनाला अटक केली आहे.

२१ वर्षीय एना लेकोविच ही वैद्यकीय शिक्षण घेणारी तरूणी असून इन्स्टाग्रामवर ती प्रसिद्ध आहे. एनाचे इन्स्टाग्रामवर १६ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेl, ती नेहमी तिचे हॉट आणि सुंदर फोटो शेअर करत असते, या फोटोला हजारोने लाईक्स मिळतात. तर एनाची आई प्रस्कोव्या लेकोविच यांचे वय ४० असून त्या जर्मनी येथे नोकरीला असतात. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार एनाच्या आईला संशय आला होता की, आपली मुलगी ड्रग्सच्या आहारी गेली आहे त्यामुळे तिच्या उपचारासाठी ती आली होती. हत्येमागे हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनाही देखील एनावर संशय आहे.

आईच्या हत्येत एना प्रमुख संशयित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार एनाने किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चाकूने पहिल्यांदा स्वत:च्या आईवर वार केला त्यानंतर तिचे ह्दय आणि अन्य अवयव कापून शरीरापासून वेगळे केले, या निर्दयी प्रकारानंतर आईचा जागीच मृत्यू झाला.