घरक्राइमकॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास एटीएसकडे वर्ग

Subscribe

कोल्हापूर – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेंच्या हत्येचा तपास महाराष्ट्र दहशतवादि विरोधी पथकाकडून करण्यात येणार आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष चौकशी पथकाने या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवली.

कोल्हापूरमध्ये कॉ गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर मॉर्निंग वॉक दरम्यान 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या उपचारा दरम्यान कॉ. पानसरेंचा मृत्यू झाला होता. कॉ पानसरे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या विशेष पथकाकडून सुरू होता. दरम्यान हा तपास एटीएसकडे सोपवण्यासाठी पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले. न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा तपास वर्ग करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

कागदपत्रे सीआयडीकडे –

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाती कागदपत्रे सीआयडीकडू मिळाली आहेत. या हत्येचा तपास एटीएसच्या पुणे शाखेकडून करण्यात येणार आहेत. या प्रकरणातील शूटरला अटक करण्यात आली आहे. तर दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.

- Advertisement -

उच्च न्यायालयाती नाराजी —

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी इतकी वर्षेझाली तरी उद्यापही तपासात प्रगती का झाली नाही?, असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारला दोन वर्षात या प्रकरणी केलेल्या पतासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने 7 जुलै 2022 मध्ये झालेल्या सुनावणीत दिले होते.

दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी मागणी –

अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यांमागील सूत्रधार एकच असून त्यांचा शोध घेण्यास सीबीआय आणि एसआयटी अपयशी ठरल्या आहेत. शेजारील राज्यात झालेल्या कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना अटक होऊन खटले आता अंतिम टप्यात आहेत. मात्र, येथे परिस्थिती जैसे थेच आणि तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या हत्येमागचे खरे सुत्रधार शोधण्यासाठी या प्रकरणांचा तपास राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एसटीएस) सोपवावा, अशी मागणी दाभोलकर- पानसरे कुटुंबियांनी हायकोर्टाकडे केली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -