Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमJustice delayed : खूनप्रकरणातून आरोपीची तब्बल 21 वर्षांनी निर्दोष मुक्तता, काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

Justice delayed : खूनप्रकरणातून आरोपीची तब्बल 21 वर्षांनी निर्दोष मुक्तता, काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

Subscribe

आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत. याशिवाय, पीडित मुलीला जेव्हा शेवटचे पाहिले गेले तसेच नंतर तिचा मृतदेह जेव्हा सापडला, यामध्ये खूप मोठा कालावधी होता. या दरम्यानच्या काळात, माजिदने खून केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

नवी दिल्ली : ठोस पुरावे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका खून प्रकरणातील आरोपीची सांगत तब्बल 21 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली. आरोपीला न्याय मिळण्यास खूप उशीर झाल्याचे न्यायालयाने मान्य केले. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात हा खटला 13 वर्षे प्रलंबित होता आणि त्यानंतर याचा निर्णय 11 महिने राखून ठेवण्यात आला होता. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि खुनासंदर्भातील हे प्रकरण 2003 सालचे आहे. (Justice delayed: The acquittal of the murderer after 21 years by the Supreme Court)

एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी ऑगस्ट 2003मध्ये मोहम्मद बानी आलम माजिदला अटक करण्यात आली होती. 2007मध्ये कामरूप सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर 2010मध्ये, गुवाहाटी उच्च न्यायालयानेही सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यानंतर 2011मध्ये माजिदने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. ऑगस्ट 2011मध्ये त्याच्या याचिकेवर पहिल्यांदा सुनावणी झाली. त्याचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला. ऑक्टोबर 2018मध्ये आजारी आईला भेटण्यासाठी माजिदला आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा – Sanjay Raut : ते 16 फिक्सर्स कोण? त्यांची नावे जाहीर करा, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला एक दशक लागले. 21 मार्च 2024 रोजी युक्तिवाद पूर्ण झाला आणि निकाल राखीव ठेवण्यात आला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, निकाल जाहीर करण्यासाठी 11 महिन्यांचा कालावधी लागला. कोणताही आरोप सिद्ध होऊ न शकल्याने न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्याला निर्दोष मुक्त केले जाते.

आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत. याशिवाय, पीडित मुलीला जेव्हा शेवटचे पाहिले गेले तसेच नंतर तिचा मृतदेह जेव्हा सापडला, यामध्ये खूप मोठा कालावधी होता. या दरम्यानच्या काळात, माजिदने खून केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. माजिद आणि पीडिता हे रिलेशनशिपमध्ये होते. तसेच त्याच्या कुटुंबाने पीडितेच्या कुटुंबीयांना लग्नाचे आश्वासनही दिले होते. अशा परिस्थितीत, पैशासाठी लैंगिक छळ करण्यात आला, असेही म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (Justice delayed: The acquittal of the murderer after 21 years by the Supreme Court)

हेही वाचा – Uddhav Thackeray : परकीय मदतीने केवळ भाजपचीच मते कशी वाढतात? उद्धव ठाकरे यांचा सवाल –