Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमKerala Murder : हातोडी घेत सहा जणांची डोकी फोडली आणि स्वतःच येऊन सांगितला थरार, नेमकं प्रकरण काय?

Kerala Murder : हातोडी घेत सहा जणांची डोकी फोडली आणि स्वतःच येऊन सांगितला थरार, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

एका 23 वर्षीय तरुणाने एक-एक करत संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या तिरुअनंतपुरमध्ये ही घटना घडल्याचं समजतं. या घटनेत आरोपीनं आजी, भाऊ आणि प्रेयसीसह एकूण सहा जणांची हत्या केल्या उघडकीस आलं आहे.

Kerala Mass Muder केरळ : एका 23 वर्षीय तरुणाने एक-एक करत संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या तिरुअनंतपुरमध्ये ही घटना घडल्याचं समजतं. या घटनेत आरोपीनं आजी, भाऊ आणि प्रेयसीसह एकूण सहा जणांची हत्या केल्या उघडकीस आलं आहे. सोमवारी (25 फेब्रुवारी) संध्याकाळी काही तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी या हत्याकांडाच्या घटना घडल्या. या हत्याकांडानंतर आरोपींनं स्वत:चं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अफान असं आरोपीचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. (kerala mass murders shattered skull dead bodies in pools affan killed 5 members of family)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अफान याच्या कुटुंबियांचा आखाती देशांत व्यवसाय होता. हा व्यवसाय डबघाईला आल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. त्यातच त्याला आखाती देश सोडून भारतात परतावं लागलं होतं. या कर्जातून कायमची सुटका मिळावी, यासाठी आरोपी अफान यानं कुटुबियांना संपवण्याचा ठरवलं. तसेच, प्लॅनिंग आणि वेळ साधत एक-एक करत कुटुंबातील सर्व सदस्यांना त्याने ठार मारलं.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. आरोपी अफान यानं जरी या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असलं, तरी पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांनी अफानचा मोबाईल जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. तसंच, त्याला ड्रग्सचं व्यसन आहे का हेही तपासलं जात आहे. अफानने सहा हत्या केल्याचा दावा केला असला तरी त्यापैकी एक व्यक्ती अद्याप मृत्यूशी झुंजत आहे. अफानच्या आईला जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यामुळे अफानने एकूण पाच खून केले आहेत.क

आरोपीनं कुटुंबातील सदस्यांना कसं मारलं?

  • आरोपी अफान याने 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरं सोडलं. घरापासून 25 किलोमीटर अंतरावर त्याची आजी सलमा बीबी राहत होती. आजीच्या घरी जाऊन त्याने हातोडीने आजीचं डोकं फोडलं आणि तिला ठार मारलं. त्यानंतर त्याने हातोडी स्वच्छ केली व तिथून बाहेर पडला.
  • तिथून तो त्याच्या काकाच्या घरी गेला. आजीच्या घरापासून 5 किमी अंतरावर त्याचे काका लतीफ राहत होते. काका समोर दिसताच अफानने खिशातली हातोडी काढली व त्यांचं डोकं फोडलं. त्यानंतर त्याने त्याची काकी सजिदाच्या डोक्यावर हातोडीने अनेक घाव घातले. दोघेही मृत्यूमुखी पडले आहेत याची खात्री करून आणि हातोडी स्वच्छ करून तो काकाच्या घरातून बाहेर पडला.
  • काका-काकीला ठार करून अफान स्वतःच्या घरी परतला. घरात त्याची पहिली भेट धाकटा भाऊ एहसानशी झाली. त्याने परत खिशातली हातोडी काढली आणि 13 वर्षीय एहसानच्या डोक्यात पहिला घाव घातला. त्यानंतर एहसान मरेपर्यंत अफान हातोडीचे घाव घालत होता.
  • त्यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन त्याने आईचं डोकं फोडलं. शाहिदा असं त्याच्या आईचं नाव आहे.
  • त्यानंतर तो खाली आला. त्याने त्याची प्रेयसी फरशाना हिला बोलावून घेतलं. फरशाना शेजारच्याच घरात राहत होती. फरशाना घरी आल्यावर तो तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर अफानने हातोडीने फरशानाचं डोकं फोडलं. तिच्या डोक्यात काही घाव घालून तिला ठार केलं.

इतकंच नव्हेतर आरोपी अफान यानं कुटुंबातील सदस्यांना ठार मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसी फरशाना हिला ठार मारल्यानंतर अफान काही वेळाने घरातून बाहेर पडला. घरातून तो थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांना हत्याकांडाची माहिती दिल्यानंतर त्याने उंदिर मारण्याचं औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत.


हेही वाचा – Mumbai Crime : बोगस कागदपत्रांद्वारे वाहन कर्ज घेऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत