घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलासलगावला दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा ३ लाखांची रक्कम लांबविली

लासलगावला दुचाकीच्या डिक्कीतून भरदिवसा ३ लाखांची रक्कम लांबविली

Subscribe

पत्ता विचारण्याचा बहाणा करत केली चोरी

लासलगाव येथील होळकर वाईन्स समोरून अज्ञात इसमांनी मोटर सायकलच्या डिक्कीतून तब्बल तीन लाख रुपये लांबविल्याची घडना घडली आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लक्ष गुंतवून हा चोरी करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील रेडगाव खुर्द येथील वसंत भागुजी काळे वय 58 यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लासलगाव शाखेतून सुमारे तीन लाख रुपयाची रक्कम काढली. सदर रक्कम आपल्या ज्युपिटर क्लासिक मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. काळे हे होळकर वाईन्स जवळ आले. त्याचवेळी दोन इसमांनी पत्ता विचारला. ते सांगत असताना अज्ञात इसमांनी डिक्कीतील तीन लाख रूपयांची रक्कम लंपास केली.

- Advertisement -

पैसे बेपत्ता झाल्याचे समजताच काळे यांनी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर अज्ञात इसमाविरोधात विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे वृत्त समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ ,पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, कैलास महाजन, प्रदीप आजगे यांचेसह पोलिसांनी बराच शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली. चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांनी पाळत ठेवून हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -