घरक्राइमसावकाराने केली आदिवासी दाम्पत्यास मारहाण

सावकाराने केली आदिवासी दाम्पत्यास मारहाण

Subscribe

ऊसतोड सावकार आणि कामगार दाम्पत्य यांच्यात अनेक दिवस आर्थिक वाद सुर होते.

नाशिकमध्ये नांदगाव तालुक्यात गंभीर घटना घडली आहे. आदिवासी दाम्पत्याला एक महिला मारहाण करत असल्याचा गंभीर व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा केला आहे. या संपुर्ण प्रकरणाची गंभीर दखल नांदगाव पोलिसांनी घेतली आहे. मारहाण करणारी महिला ही ऊसतोड मुकादम आहे. ऊसतोड सावकार आणि कामगार दाम्पत्य यांच्यात अनेक दिवस आर्थिक वाद सुर होते. ऊसतोड सावकार आणि कामगार दाम्पत्य यांच्यात मारहाणीचा प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले. पिंप्राळे येथील महिला, तिचे मावसभाऊ आणि वहिनी हे तिघेही शेवगाव येथे ऊसतोडीचे काम करतात. मारहाण करणारी म्हणजेच ऊसतोड सावकारकडून या तिघांनी काही रक्कम घेतली होती. या तिघांनी मे २०२० मध्ये एक लाख साठ हजार रुपये कामासाठी म्हणून महिलेकडून घेतले होते. मात्र ऊसतोडीचे काम या तिघांनी न करता दुसऱ्या ठिकाणचे काम स्वीकारले. हे आदिवासी दाम्पत्य बऱ्याच महिन्यांनी गावात आल्याचे समजताच त्या ऊसतोड सावकार महिलेने त्या जोडप्याला मारहाण केली. परंतु या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

दुष्काळी तालुक्यात सापडलेल्या गोरगरिबांना लुटून सावकारी पैशावर मोठे झालेले खाजगी सावकार पठाणी पद्धतीने वसुली करून दहशत करत असतात. अशा अनेक घटना आपण नेहमीच ऐकत असतोच, परंतु या प्रकरणावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यातच खासगी सावकाराच्या दहशतीने एका ऊसतोड कामगाराने आपले जीवन संपवल्याची चर्चा माण तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणाचा भांडाफोड करण्याची मागणी होत आहे. तसेच खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकारणामुळे काँग्रेसची अवस्था ‘खाया पिया कुछ नही और गिलास तोडा बारा आणा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -