घरक्राइमजीवरक्षक दलाच्या युवकांनी काळू नदीत बुडालेले दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले

जीवरक्षक दलाच्या युवकांनी काळू नदीत बुडालेले दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह बाहेर काढले

Subscribe

काळू नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने आंघोळीसाठी व पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या आंबिवलीतील दोन अल्पवयीन मुलांचा पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रोजी घडली. काल शोधाशोध करूनही त्यांचे मृतदेह हाती लागले नव्हते. मात्र आज सकाळी दोघांचे मृतदेह सापडल्याची माहिती टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजूवंजारी यांनी दिली.

काल आंबिवलीत नेपच्यून संकलनात राहत असणारे प्राण विलास कुदळे(१४) व साहिल उमेश चव्हाण(१६) हे दोघे टिटवाळयाहुंन वाहत येत असलेल्या अटाळी येथील काळू नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेले होते. मात्र उशिरा पर्यंत ते घरी न परतल्याने प्राण चे वडील विलास कुदळे यांनी सायंकाळी टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये नदीच्या पात्रात मुले बुडाल्याची तक्रार दिली होती. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी येत अग्निशमन दलाला मुलांचे शव शोधण्यासाठी पाचारण केले मात्र अंधारात दोन्ही शव प्रयत्न करूनही भेटले नव्हते.

- Advertisement -

आज शनिवारी अटाळी तील काळू नदी पात्रात जीव रक्षक दलाचे कार्यकर्ते अग्निशमन दल सकाळी घटना स्थळी पोहोचण्यापूर्वी ज्या ठिकाणी दोन्ही अल्पवयीन मुले बुडाली होती त्याच ठिकाणी शोध मोहीम घेत असणारे जीव रक्षक दलाचे साहिल कातडे, अक्षय तुपलोंढे, जिग्नेश भोये व भूषण कातडे यांना घेत नदीपात्रात ‘ऑपरेशन सर्च’ ला सकाळी सुरुवात केली. पाणी अत्यंत गढूळ व घाण होते. इतर कोणीही उतरण्याची हिम्मत करत नव्हते. टिटवाळा पोलीस स्टेशनचे सचिन गायकवाड हे पोलीस कर्मचारी संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून होते. महापालिकेचे फायरब्रिगेडने प्रयत्न करूनही अल्पवयीन मुलांचे मृतदेह हाती लागले नव्हते. साहिल कातडे व त्याच्या टीम कडे कोणतेही बचाव साहित्य नसताना फक्त सेफ्टी जॅकेट वर अथांग पात्रात उडी घेत अवघ्या वीस मिनिटात बुडालेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले. अल्पवयीन मुलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी चौधरी यासंदर्भात,” बहुतेक वेळेस नदीच्या पात्रात बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी या युवकांची मोठी मदत मिळत असते. काल उशिरा पर्यंत आमच्या टीमने नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला असता मृतदेहांचा शोध लागू शकला नाही परंतु आज सकाळी या युवकांनी पात्रात उतरून दोन्ही मृतदेह आम्ही घटनास्थळी येण्यापूर्वीच बाहेर काढले.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -