Chhota Rajan gang : छोटा राजन टोळीतील अराफत लोखंडवालाला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Thane Special POSCO Court verdict Father and son 10 years imprisonment for abusing disabled girl
अपंग मुलीवर अत्याचार करणाऱ्या पिता-पुत्रांना १० वर्षे सश्रम कारावास, न्यायालयाचा निर्णय

कुख्यात गुंड छोटा राजन याच्या टोळीतील एकाला मुंबई गुन्हा शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली होती. अराफत उर्फ अराफत आरफ लोखंडवाला असं या आरोपीचे नाव आहे. मुंबईत मोठ्याप्रमाणात घातक शस्त्र घेऊन येत असताना त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर आरोपी अराफतला आज स्थानिक न्यायालयात हजर करण्याच आले होते. यावेळी स्थानिक न्यायालयाने आरोपीला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी अराफतकडून पोलिसांनी अवैध देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि २८ राऊंड जप्त केले आहेत. खबरांच्या माहितीच्या आधारे, भायखळा परिसरात एक व्यक्ती घातक शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. यावेळी माहितीची शहानिशा करत खंडणी विरोधी सेलने भायखळ्यात सापळा रचून आरोपी अराफत आरिफ लोखंडवाला याला ताब्यात घेतले.

दरम्यान 2003 मध्ये आरोपी अराफतने वाशी येथील एका विकासकाची हत्या केल्याची आणि एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा पायधोनी येथील रहिवासी असून त्याच्यावर मुंबई आणि पुणे येथे खुनाचा प्रयत्न, दरोडा, फसवणूक आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. तसेच भायखळा येथे हा कोणाला शस्त्रे देण्यासाठी आला होता याचा तपास खंडणी विरोधी पथक करत आहे.


हिंदुत्वाबरोबरचं मराठीचा मुद्दा लावून धरा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश