धक्कादायक! जातीमुळे फूड डिलिव्हरी बॉयच्या हातून जेवण नाकारत तोंडावर थुंकला, नेमकं प्रकरण काय?

या घटनेत विपिनच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचेही वृत्त आहे

lucknow customer refuses to take food from zomatos dalit delivery boy and spit tobacco on mouth

एका फूड डिलिव्हरी बॉयला जात विचारून त्याच्या हातचं जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या फूड डिलिव्हरी बॉयला त्याची जात विचारून जेवण घेण्यास नकार देत नंतर त्याच्या अंगावर थुंकण्यात आल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ आशियानामधून ही घटना घडली आहे. शहरातील किला मोहम्मदी परिसरात राहणारे विपिन कुमार रावत हा एका खासगी कंपनीत एसी टेक्निशयन आहे. यासोबतच तो झोमॅटो कंपनीत पार्ट टाईम डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करतो.

विपिन कुमार रावत हा शनिवारी रात्री आशियाना सेक्टर एच येथील अजय सिंह यांच्या घरी जेवणाच्या ऑर्डर देण्यासाठी गेला होता. यावेळी घडलेल्या घटनेवरून त्यांनी आरोप केला की, ऑर्डर देताना दारात आलेल्या एका व्यक्तीने त्याचे नाव विचारले. विपिन कुमार रावत असे आपले नाव सांगताच त्या व्यक्तीने त्याला जातीवाचक शिवीगाळ केली आणि एका दलिताच्या हातातून जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिला. यानंतर ऑर्डर रद्द करा असे सांगताच तो व्यक्ती संतापला आणि त्याने तोंडातील तंबाखू माझ्या (डिलीव्हरी बॉयच्या) तोंडावर थुंकली.

विरोध केल्याने 10-12 जणांकडून बेदम मारहाण

विपिन रावत याच्या म्हणण्यानुसार, विरोध केल्यानंतर 10-12 लोक घरातून बाहेर आले आणि त्यांनी मला मारहाण केली. यादरम्यान त्याला माझी बाईक जागीच सोडून पळून जावे लागले. यानंतर विपिनने यूपी पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विपिनला त्याची बाईक परत मिळवून दिली. त्याचवेळी डिलिव्हरी बॉयने या संपूर्ण घटनेबाबत आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर आशियानाचे निरीक्षक दीपक पांडे यांनी सांगितले की, विपिन कुमार रावत यांच्या तक्रारीवरून अजय सिंग, अभय सिंग आणि 10-12 अज्ञात लोकांविरुद्ध प्राणघातक हल्ला, बंडखोरी, धमकावणे आणि अनुसूचित जाती/जमातीच्या कलमांखाली एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेत विपिनच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचेही वृत्त आहे.

त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावर आरोपींचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरात स्वयंपाकाचे काम दलित महिला करते. डिलीव्हरी बॉय विपिन कुमार रावत याच्या अंगावर चुकून थुंकले गेले, ज्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


विधान परिषदेत राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, सचिन अहिर यांचा निर्धार