घरक्राइममहाबळेश्वरमध्ये लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

महाबळेश्वरमध्ये लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

Subscribe

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून डोंबिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच महाबळेश्वरमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लैंगिक अत्याचारातून काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर ते बाळ कांदीवली येथील एका कुटुंबाला दत्तक देण्यात आल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. याप्रकरणी दोन मुख्य आरोपींसह नऊ जणांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडीता महाबळेश्वरला राहत असून मोलमजुरी करते. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे हे दोघे आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. यातून तिला दिवस गेले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचा गर्भपात करणेही कठीण होते. यामुळे घरातच तिची प्रसुती करण्यात आली. तिने मुलीला जन्म दिला आहे. याबद्दल कळताच वाई पोलिसांनी पीडिता व तिच्या कुटुंबियांना विश्वासात घेतले. त्यानंतर पिडीतेची आपबीती ऐकूण पोलिसांनाही धक्का बसला.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे या दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या दोघांनी ते बाळ महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व माजी शिवसेना नेते डी एम बावळेकर यांचा मुलगा योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर यांच्या मदतीने कांदीवली येथील एका कुटुंबाला दत्तक दिले. त्यामोबदल्यात त्यांच्याकडून लाखो रुपयेही घेतल्याचे समोर आले. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चारजणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बाळ दत्तक देत असल्याचे बॉंड करणाऱ्या वकिलावर व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -