पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गोळीबार करत गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबई आणि ठाण्यात दोन गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता आज पुण्यात पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादानंतर गोळीबार झाल्याचे समोर येत आहे. आरोपीने व्यावहारात भागीदार असलेल्या व्यक्तीवर गोळीबार करत आत्यहत्या केली आहे. पुण्यातील औंध भागात गोळीबार झाला आहे. (Maharashtra Crime Shooting continues After Mumbai now firing in Pune)
हेही वाचा – Maharashtra : मोदी तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर; तर अमित शहा ‘या’ दिवशी विदर्भात
गणपत गायकवाड, अभिषेक घोसाळकर तसेच काही दिवसांपूर्वी पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या दिवसाढवळ्या हत्येनंतर आज पुन्हा एकदा पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून अनिल ढमाले याने आकाश जाधव यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. आकाश जाधव याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. औंध येथील ज्युपिटर चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औंधमधील ज्युपिटर चौकात आकाश जाधवचे (39, रा. बाणेर) बाणेर येथील हाय स्ट्रीटवर आकाश यांची सुवर्ण पेढी आहे. जी गेली 14 वर्षे आरोपी अनिल सखाराम ढमाले (52, रा. बालेवाडी) हा अनिल ज्वेलर्स या नावाने चालवत होता. व्यावसायिक कारणाने ढमालेने आकाशकडून उसने पैसे घेतले होते आणि याच कारणाने दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
हेही वाचा – Ajit Pawar : ‘राज्यपाल भेटीनंतर काही होत नाही’; ठाकरेंच्या वक्तव्यावर अजित पवारांचा दुजोरा
याचपार्श्वभूमीवर आकाशने अनिल ढमाले याला त्याच्या दुकानात बोलावून घेतले. यानंतर ते दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यसाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या आरोपी अनिल ढमाले यांनी आकाशवर मागून गोळी चालवली. यानंतर तो रिक्षात पुणे स्टेशनच्या दिशेने पळून गेला. मात्र त्याने थोड्या अंतरावर गेल्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली आहे. यानंतर अनिल ढमाले याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत त्याने म्हटले की, गेल्या काही महिन्यांपासून आमच्या दोघांमध्ये आर्थिक वाद सुरू होता. या त्रासाला कंटाळून हा हल्ला केला आहे. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत आहेत.