Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमSilver Bricks : ऐन मतदानात तब्बल 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त;...

Silver Bricks : ऐन मतदानात तब्बल 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त; नाशिक पोलिसांची कारवाई

Subscribe

ऐन निवडणुकीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. आता मतदानाच्या दिवशीच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या.

मुंबई : ऐन निवडणुकीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. आता मतदानाच्या दिवशीच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोडोंचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याचा तपास सुरू आहे. (maharashtra police seize 10000 kg of silver bricks worth over rs 94 cr in dhule shirpur)

राज्यात बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी मतदान झाले. यावेळी मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस नजर ठेवून होते. धुळे पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शिरपूर येथील थालनेर गावात गाड्यांच्या तपासणीदरम्यान जवळपास 94 कोटींहून अधिकचा मुद्देमाल पकडला. जवळपास 10 हजार किलो चांदीच्या विटा पोलिसांनी या तपासणीत जप्त केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Exit Poll Result 2024 : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती…काय सांगतात आकडे

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. एका मोठ्या कारवाईअंतर्गत पोलिसांनी शिरपूर येथे एका कंटेनरमध्ये 94.68 कोटी रुपये एवढ्या किंमतीच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा जप्त केल्या.

- Advertisement -

राज्यात आज मतदान सुरू आहे. या काळात पोलिसांकडून वाहनांची काटेकोरपणे तपासणी सुरू होती. याच तपासणीत पहाटे पाच वाजता शिरपूर तालुक्यातील थालनेर गावात एका कंटेनरची तपासणी केली. या तपासणीत कंटेनरमधून ही चांदी जप्त करण्यात आल्याचे कराळे यांनी सांगितले. या कंटेनरमध्ये सापडलेल्या किंमती वस्तू या बँकेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरे ठरणार किंगमेकर? एक्झिट पोलची आकडेवारी समोर…

याआधी देखील मुंबई पोलिसांनी गेल्या शनिवारी एका कंटेनरमधून साडे आठ हजार किलो चांदी जप्त केली होती. त्याची किंमत 80 लाख रुपये सांगितली जात आहे. ईडी आणि जीएसटी या प्रकरणाचा तपास करते आहे. (maharashtra police seize 10000 kg of silver bricks worth over rs 94 cr in dhule shirpur)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -