Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशाच आमिष दाखवून डॉक्टरला ५० लाखाचा गंडा

मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशाच आमिष दाखवून डॉक्टरला ५० लाखाचा गंडा

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या एका २६ वर्षांच्या डॉक्टर तरुणाची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे.

Related Story

- Advertisement -

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या एका २६ वर्षांच्या डॉक्टर तरुणाची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली आहे. निखील निरंजन छगानी आणि जुगल सचदे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याच्या नावाने पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याचा या दोघांवर आरोप आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; २६ वर्षांची तक्रारदार तरुणी ही व्यवसायाने डॉक्टर असून ती तिच्या आई-वडील आणि बहिणीसोबत अंधेरीतील जोगेश्वरी-विक्रोळी एमएमआरडीए कॉलनीत राहते. तिचे एमबीबीएसपर्यंत शिक्षण झाले असून सध्या ती जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. तिला एमडीचे (पिडीचाईल्स) शिक्षण पूर्ण करायचे होते. त्यासाठी तिने नीटची परिक्षा दिली होती. मात्र, या परिक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिला एमडीसाठी प्रवेश मिळाला नव्हता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते, याच दरम्यान तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन पिडीचाईल्स एमडी शिक्षणासाठी नवी मुंबईतील एमडीएम कॉलेज आणि परळच्या केईएम कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले होते. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र, याच व्यक्तीने तिला पुन्हा मॅसेज करुन तिला हमखास प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तिने या मोबाईल क्रमांकावर फोन केला होता.

अशी केली फसवणूक

- Advertisement -

त्यानंतर तिची निखील छगानी आणि जुगल सचदे यांच्याशी ओळख झाली होती. या दोन्ही कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळेल, असे सांगून या दोघांनी तिच्याकडे प्रवेशासाठी एक कोटी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तिने त्यांना ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत तिने त्यांना सुमारे ५० लाख रुपये दिले. मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला या दोन्ही कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून दिला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यात नंतर या दोघांनीही त्यांचा मोबाईल क्रमांक बंद केला होता. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तिने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारेत निखील छगानी आणि जुगल सचदे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शनिवारी निखिल छगानी आणि जुगल सचदे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काहींची फसवणूक केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – अपहरण झालेल्या १६ वर्षीय तरुणीचा पाच महिन्यानंतरही शोध सुरूच


- Advertisement -

 

- Advertisement -