घर क्राइम रात्री गुपचूप भेटले अन् घरात गळफास...; नागपूरमध्ये वर्षभराच्या प्रेमाचा धक्कादायक अंत

रात्री गुपचूप भेटले अन् घरात गळफास…; नागपूरमध्ये वर्षभराच्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Subscribe

नागपूर : नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी धक्कदायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील पारशिवनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पेंढरी गावात प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज (5 सप्टेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली असून गावात तणावाचे वातावरण आहे. प्रेमी युगुलाने आत्महत्या का केली, याची माहिती मिळू शकली नाही. पण प्रेमाला विरोध होण्याच्या शक्यतेने दोघांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Met secretly at night and hanged in the house A shocking end to a year long love affair in Nagpur)

हेही वाचा – धक्कादायक आकडेवारी; वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे वर्षाला दीड लाख मृत्यू

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव राजेंद्र बघमारे (18) व 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. गौरव बघमारे या तरुणाने नुकतेच 12 वी चे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो सध्या सावनेर येथे आयटीआयमध्ये पुढील शिक्षण घेत होता. तर 17 वर्षीय तरुणी 12 वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. सोमवारी (4 सप्टेंबर) रात्री दोघांनी उशिरारात्रीपर्यंत whatsapp chat केले. यावेळी दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही गौरव बघमारे यांच्या घराजवळील बंद घराच्या इथे भेटले आणि तिथेच दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – कोट्यवधींच्या थकीत ई-चलान दंडाची होईना वसुली; आता ‘ही’ नवीन शक्कल

- Advertisement -

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी गावातील एका नागरिकाला घराचा दरवाजा उघडा दिसला. यावेळी नागरिकाने घरात डोकावून पाहिले असता त्याला प्रेमी युगुल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर त्याने तत्काळ पारशिवनी पोलिसांशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. त्यानंतर पारशिवनी पोलिसांचे पथक त्याठिकाणी हजर झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रेमी युलुगाने आत्महत्या का केली, याबाबत पोलिसांनी माहिती मिळू शकलेली नाही. पण दोघांनी प्रेमाला विरोध होण्याच्या शक्यतेने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पारशिवनी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – ‘पीआय’पदी बढती होण्याआधीच एपीआयने घेतली लाच; ‘जीएसटी’ अधिकारीही जाळ्यात

हिंदू-मुस्लिम प्रेमी युगलाची आत्महत्या

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातही तीन दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम प्रेमी युगुलाने प्रेमाला विरोध असल्याने आत्महत्या केली होती. अरबाज शब्बीर पकाले (19) आणि 17 वर्षीय तरुणीचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. अल्पवयीन मुलगी ही इयत्ता अकरावीमध्ये शिकत होती तर, अरबाज हा दहावीनंतर बोअरवेल गाडीवर कामाला जात होता. या दोघांच्या प्रेमाची कुणकुण सहा महिन्यांपूर्वी तरुणीच्या घरी लागली. यानंतर तरुणीच्या कुटुंबाने तिला सक्त ताकीद देऊन कॉलेजला जाणं बंद केलं होतं. मात्र त्यानंतरही दोघांमध्ये संपर्क होत होता. मात्र 2 सप्टेंबर रोजी तरुणी घरातून अचानक गायब होत अरबाजचे घर गाठले. यावेळी दोघांनी आधी फिनेल प्राशन केले आणि त्यानंतर एकाच दोरीला गळफास घेत आत्महत्या केली.

- Advertisment -