Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम लहान मुलाच्या शरीरात भरली हवा, पुढे जे झालं त्याने तुम्हाला धक्काच बसेल

लहान मुलाच्या शरीरात भरली हवा, पुढे जे झालं त्याने तुम्हाला धक्काच बसेल

Related Story

- Advertisement -

पंजाबमधील अमृतसर येथे वेल्डिंग शॉपमध्ये काम करणार्‍या एका ११ वर्षाच्या मुलाच्या शरीरात हवा भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या शरीरात हवा बरल्याने प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला वल्ला येथील श्री गुरु रामदास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामदास यांनी सायकल दुरुस्ती दुकानात काम करणाऱ्या आरोपी अल्पवयीन मुलाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की तो कष्ट करून त्याचे कुटुंब चालवतो. चार वर्षांपासून त्याची पत्नी माहेरी राहत आहे. तो आपल्या आई आणि मुलासह राहतो. त्याचा मुलगा सरकारी शाळेत शिकला. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपूर्वी त्याने आपल्या मुलाला गावाबाहेर वेल्डिंग शॉपवर कामावर ठेवले. जवळच सायकल पंक्चरचे दुकान आहे. तिथे काम करणार्‍या १७ वर्षाच्या मुलगा बर्‍याचदा त्याच्या मुलाबरोबर गैरवर्तन करायचा.

- Advertisement -

आरोपीने शुक्रवारी त्यांच्या मुलाला त्याच्या दुकानात बोलावून घेतले आणि त्याच्या शरीरात हवा भरली. यामुळे मुलाच्या पोटातील आतडे फूटले. त्याला श्री गुरु रामदास रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सायकल पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी रामदास मनतेज सिंह यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

 

- Advertisement -