घरक्राइम'आमदार व्हिडिओ कॉलवर स्वतः विवस्त्र व्हायचे मग मलाही सांगायचे'; आमदार पुत्र, पुतण्यानेही...

‘आमदार व्हिडिओ कॉलवर स्वतः विवस्त्र व्हायचे मग मलाही सांगायचे’; आमदार पुत्र, पुतण्यानेही केला बलात्कार

Subscribe

उत्तर प्रदेश राज्यात रोजच महिलांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत असतात. मात्र ज्यांच्यावर अत्याचार रोखण्याची जबाबदारी आहे, ते लोकप्रतिनिधी देखील अत्याचार करण्यात पुढे असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. युपीच्या भदोही जिल्ह्यातील ज्ञानपुर मतदारसंघाचे आमदार विजय मिश्रा (MLA Vijay Mishra) यांचा असाच एक प्रताप सध्या समोर आलाय. जमीन बळकवल्याच्या आरोपाखाली मिश्रा सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. आता त्यांच्यावर बलात्काराचाही गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पीडितेने नवभारत टाइम्स या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा यांचे आंबट शौकिन धंदे समोर आणले आहेत. हे आमदार व्हिडिओ कॉल करुन पीडितेसमोर विवस्त्र व्हायचे आणि नंतर पीडितेलाही विवस्त्र होण्यास धमकवायचे, असा आरोप पीडितेने केला आहे.

गायिका (Singer Rape victim) असलेल्या वाराणसीच्या या पीडित महिलेने तिच्यावर प्रयागराज आणि वाराणसी येथे मिश्रा यांनी वारंवार बलात्कार केल्याचे सांगितले. आमदार मिश्रा २०१४ पासून आपल्याला त्रास देत आहेत. जिवे मारण्याची धमकी देत त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले. फक्त मीच नाही तर आमदारांनी माझ्यासारख्या अनेक तरुणींसोबत असे विकृत चाळे केल्याचे पीडितेने सांगितले.

- Advertisement -

मिश्रा हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बाहुबली आमदार समजले जातात, त्यामुळे त्यांच्याविरोधात कुणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. मी देखील भीतीच्या सावटाखाली अनेक दिवसांपासून तक्रार करत नव्हते, असेही पीडितेने सांगितले. मात्र आता मिश्रा गजाआड झाल्यानंतर मी सर्व शक्ती एकवटून त्याच्या विरोधात उभी राहिली आहे. माझ्याप्रमाणे ज्या ज्या तरुणींवर अत्याचार झाले आहेत, त्यांनी देखील या राक्षसाला गाडण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन देखील पीडितेने केले आहे.

कोण आहेत विजय मिश्रा?

विजय मिश्रा हे निशाद (Nirbal Indian Shoshit Hamara Aam Dal) पक्षाचे आमदार आहेत. बलात्कार प्रकरणात मिश्रा यांच्या मुलावर आणि निशाद पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१४ साली गायिकेला एका कार्यक्रमासाठी आमदारांनी बंगल्यावर बोलावलं होतं. तिथंच तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

भदोईचे पोलीस अधीक्षक राम बदन सिंग यांनी सांगितले की, २०१५ साली मिश्रा यांनी वाराणसी येथे गायिकेवर बलात्कार केला. त्यानंतर तिला सोडण्यासाठी आपला मुलगा आणि भाच्याला पाठवले. मात्र या दोन नराधमांनी देखील वाटेत तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -