Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम IPL मध्ये लावत होता सट्टा; विरोध करताच केली आई, बहिणीची हत्या

IPL मध्ये लावत होता सट्टा; विरोध करताच केली आई, बहिणीची हत्या

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १३ वा हंगाम १० नोव्हेंबरला संपला. आयपीएल सुरु झाल्यावर सट्टाबाजार सुरु होतो. तसाच एका तरुणाने आयपीएलमध्ये सट्टा लावायला सुरुवात झाली. सट्टेबाजीला त्याच्या आई आणि बहिणीने विरोध केला. यामुळे राग आल्याने त्याने दोघींची हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी हैदराबाद येथील रावळकोल गावातील प्रभाकर रेड्डी यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनिता (४५), मुलगी अनुषा आणि मुलगा साईनाथ हे तिघे एकत्र राहत होते. सुनिता या एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. तर साईनाथ एम.टेक शिकत असून तो नोकरी करत होता आणि अनुषा बी.फार्मचे शिक्षण घेत होती.

- Advertisement -

आरोपी साईनाथ याचे वडील प्रभाकर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम आणि जमीन विक्रीवर मिळालेल्या रकमेसह २० लाख रुपये बँकेत जमा होते. दरम्यान, आरोपी साईनाथ आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला. मात्र, सट्ट्यामध्ये मोटी रक्कम त्याने गमावली. सट्टेबाजीत हरल्यामुळे आरोपी साईनाथ कर्जात बुडाला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने बँकेतील २० लाख रुपये काढले. इतकेच नाही, तर त्याने बँकेत ठेवलेले १५० ग्रॅम सोन्याचे दागिनेही विकले. या संपूर्ण प्रकाराची साईनाथच्या आई आणि बहिणीला जराही कल्पना नव्हती. काही दिवसांनी ही गोष्ट आई आणि बहिणीच्या लक्षात आली. त्यांनी बँकेतील पैशांबाबत आणि सोन्याबाबत साईनाथकडे विचारणा केली. त्याने खेळलेल्या सट्टेबाजीवर दोघींनी आक्षेप घेत, हे सर्व थांबवण्याचं सांगितले. मात्र, याचाच राग मनात ठेवून २३ नोव्हेंबरला कामावर जाण्यापूर्वी अन्नामध्ये विष मिसळले.

साईनाथने जेवणात विष टाकल्याची दोघींनाही माहित नव्हती. त्यांनी दुपारी ते जेवण केल्यानंतर, दोघींना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. साईनाथच्या आईने लगेचच साईनाथला फोन करून बोलावून घेतले आणि त्या दोघींना जेवणातून त्रास झाल्याने, त्याला लंचबॉक्स मधील जेवण न खाण्याचेही सांगितले. साईनाथ घरी आला. मात्र, दोघींनाही रुग्णालयात घेऊन गेला नाही. अनुषाला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आरोपी साईनाथची आई सुनिता यांचा २७ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. तर अनुषाने २८ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. दोघींच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबिय आणि इतर नातेवाईकांकडे साईनाथने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -