मावस भावाचा बहिणीवर अत्याचार; अश्लिल फोटो पाठवून मोडले लग्न

नाशिक : येथील एका मावस भावाने बहिणीवर पाच वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एअवढेच नव्हे, तर पीडितेचे लग्न ठरले असतानाही तिला लग्नासाठी आग्रह करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी या तरुणाने दिल्याची फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी निखिल लोखंडे नामक संशयिताविरोधात रविवारी (दि. 10) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आडगाव शिवारात राहणार्‍या मावशीकडे शिक्षणासाठी संंबंधित मुलगी आली आहे. या काळात संशयित निखिल लोखंडे नावाच्या तिच्या मावस भावाने पीडितेला विविध प्रलोभने देत तिच्यावर बळजबरी केली. तसेच तिचे अश्लिल फोटोही काढले. यानंतर तिला हे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 5 वर्षे वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. दरम्यान, या पीडित मुलीचे लग्न ठरले. मात्र, निखिलने तिच्या होणार्‍या नवर्‍याला ‘ही माझी दुसरी बायको आहे’ असे खोटे सांगत बदनामी केली. यामुळे तिचे लग्न मोडले. अखेर त्रस्त पीडितेने सर्व प्रकार मावशीला सांगितला. मात्र, याचा कुठलाही परिणाम झाला नाही. संशयित भाऊ छळ करतच असल्याने अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील संशयित फरार झाला असून, पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव हे पुढील तपास करत आहेत.