घरक्राइमMumbai Blast Threat Message: मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी; पोलीस अलर्ट...

Mumbai Blast Threat Message: मुंबईत सहा ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

Subscribe

मुंबईतील विविध सहा ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. हा मेसेज गांभीर्यानं घेत पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे मॅसेज आला. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे मॅसेजमध्ये म्हटले आहे. या मॅसेजनंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून, अद्याप मॅसेज पाठविणाऱ्याचा शोध लागला नाही. (Mumbai Blast Threat Message Bomb blast threat at six locations in Mumbai On police alert mode)

- Advertisement -

मुंबईतील विविध सहा ठिकाणं बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. हा मेसेज गांभीर्यानं घेत पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मेसेज करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : चार दिग्गजांविनाच मैदानात उतरणार टीम इंडिया; इंग्लंडशी बरोबरी साधण्याची ‘कसोटी’

- Advertisement -

मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आला आहे. एका अनोळखी व्यक्तीनं हा मेसेज पाठवला असून हा व्यक्ती कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

याआधी पुणे पोलिसांच्या नियंत्रणा कक्षालाही धमकीचा मेसेज आला होता. गुरुवारी रात्री पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या रूमच्या वॉट्सअप नंबरवर पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याचा मेसेज आला होता. त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -