घरक्राइमसलमान खान धमकी प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची टीम...

सलमान खान धमकी प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेची टीम दिल्लीला रवाना

Subscribe

मुंबई गुन्हा शाखेने बुधवारी 8 जून रोजी पोलिसांचे एक पथक तयार करून दिल्ली येथे रवाना केले आहे. आता याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जात आहे. याशिवाय गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसही याप्रकरणाची कसून तपासणी करत आहेत

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानला आलेल्या धमकीचे प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. मुंबई पोलिसांकडून सलमान खान आणि त्याच्या वडीलांना आलेल्या धमकीच्या पत्राची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई गुन्हा शाखेने बुधवारी 8 जून रोजी पोलिसांचे एक पथक तयार करून दिल्ली येथे रवाना केले आहे. आता याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली जात आहे. याशिवाय गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसही याप्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. सलमान खानच्या वडीलांना वांद्रे येथे मिळालेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, “सलीम खान, सलमान खान लवकरच तुमचा मूसेवाला होणार. GB…LB”. या पत्रात GB आणि LB या शब्दांचा अर्थ पोलिसांच्या मते, गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई असा अंदाज वर्तवला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, “हे धमकीचे पत्र गुंडांनी पाठवले यावर आमचा विश्वास नाही. मात्र आम्ही याकडे दुर्लक्ष सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बिश्नोईची चौकशी करण्यासाठी आम्ही आमची एक टीम दिल्लीला रवाना केली आहे”. सध्या बिश्नोई, गुंड टोळ्यांना शस्त्र पुरवल्याच्या प्रकरणामुळे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.

- Advertisement -

दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, ते दिल्ली पोलिसांच्या पथकासह बिश्नोईची चौकशी करण्याची अपेक्षा करत आहेतच. सिध्दू मुसेवालाच्या हत्येप्रकरणात बिश्नोईचे नाव समोर आले होते. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी अज्ञातांनी गोळ्या झाडून सिध्दू मुसेवालाची हत्या केली होती. पंजाब पोलिसांनी सांगितले की, ही हत्या बिश्नोई आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार यांच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे.

याप्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी सलमान आणि सलीम खानचा जबाब नोंदवलेला आहे. तसेच यांच्या राहत्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र सलमानने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितवले की, त्याचे कोणशीही शत्रूत्व नाही. अलीकडे त्याला कोणाच्या धमकीचे कॉल सुद्धा आलेले नाहीत.


हेही वाचा :विकृत आई-वडिलांनी केला आपल्याच मुलाचा सौदा; मुलाला विकून मिळालेल्या पैशातून घेतला कुलर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -