Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमMumbai Crime : बोगस कागदपत्रांद्वारे वाहन कर्ज घेऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

Mumbai Crime : बोगस कागदपत्रांद्वारे वाहन कर्ज घेऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

Subscribe

मुंबई : चोरी करण्यासाठी लोकं काय शक्कल लावतील, याचा काही नेम नाही. मुंबईमध्ये एका टोळीने खोटी आणि बोगस कागदपत्रे बनवून विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवले. या कर्जाच्या पैशातून नामांकित कंपन्यांची मोटार वाहने खरेदी केली. त्या वाहनांची देशामधील वेगवेगळ्या राज्यात विक्री केली. ती वाहने गहाण ठेवून बँकांची आणि वाहन खरेदी करणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे. पण याबाबत एक तक्रार आल्यानंतर सापळा रचत या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (mumbai crime Buying and selling cars through bogus documents gang busted)

हेही वाचा : Sajjan Kumar : सज्जन कुमार यांना फाशीच द्यायला पाहिजे, डीएसजीएमसीची प्रतिक्रिया 

टोळीमधील आरोपींनी बनावट आधार कार्ड बनविणे, वाहनांचे आरसी बुक बनविणे, एमएमआरडीएचे अलॉटमेंट लेटर बनविणे, बँक स्टेटमेंट बनविणे, आयकर विवरणपत्रे तयार करून त्याच्या माध्यमातून विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवले होते. ही टोळी वाहन कर्ज मिळवून महागड्या चारचाकी वाहने खरेदी करत होते. त्यानंतर महागडी वाहने देशातील विविध राज्यांमध्ये आरसी बुकच्या आधारे विकत होते. चोरीच्या गाड्यांमध्ये बदल करून त्या गाड्यांची विक्री करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

असे आले प्रकरण समोर

24 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदीप शर्मा या व्यक्तीने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल कंपनीकडून महिंद्रा थार ही गाडी घेण्यासाठी कर्ज घेतले. त्यासाठी त्याने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार केले. यावेळी त्याने 16,03,627 रुपये इतके कर्ज बँकेकडून मंजूर करून घेतले. पण ही बाब महिंद्रा कंपनीच्या लक्षात आली. यानंतर प्रदीप शर्माने कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले. यानंतर कंपनीने पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या कक्ष 3च्या तपास पथकाने सखोल तपास सुरू केला तसेच ही आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांना सापळ रचला आणि या टोळीला पोलिसांना गजाआड केले.