Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमMumbai Crime : अल्पवयीन मुलीवर पेट्रोल ओतून मित्रानेच पेटविले, अंधेरीच्या मरोळमधील घटना

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीवर पेट्रोल ओतून मित्रानेच पेटविले, अंधेरीच्या मरोळमधील घटना

Subscribe

मुंबई : अल्पवयीन मुलीला पेट्रोल ओतून तिच्या मित्राने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना अंधेरीतील मरोळ येथे घडली आहे. या घटनेमध्ये ते दोघेही गंभीर भाजले असून त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी मित्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 17 वर्षांची ही मुलगी तिच्या आई-वडिल आणि तीन भावडांसोबत अंधेरीतील मरोळ परिसरात राहत होती. आरोपी हा तिचा मित्र असून तोदेखील याच परिसरात होता. (Mumbai Crime Man Sets 17-Year-Old Girl on Fire in Andheri)

हेही वाचा : Raigad Accident : ताम्हणी घाटात कार – एसटीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलगी आणि तिच्या मित्राला परिसरात फिरताना काही लोकांनी पाहिले होते. ही माहिती तिच्या पालकांना समजताच त्यांनी मुलीची समजूत काढली. तसेच. तिच्या मित्राला यावेळी मुलीला भेटू नकोस अशी ताकीददेखील मुलीच्या पालकांनी मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी तिच्या मित्राशी बोलत नव्हती. तसेच, त्याचे फोनही मुलगी उचलत नव्हती. या गोष्टीचा तिच्या मित्राला राग आला आणि रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री 11.30 वाजता तिच्या घराजवळ गेला. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. त्यातून रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते.

या घटनेमध्ये ते दोघेही गंभीररीत्या भाजले गेले. त्यामध्ये ती मुलगी 60 ते 65 टक्के, तर तिचा मित्र हा 40 ते 45 टक्के भाजला गेला. यावेळी दोघांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील बर्निंग विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयामध्ये गेलेल्या पोलीस पथकाने या मुलीसह तिच्या आईची चौकशी करून जबानी नोंदविण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.