घर क्राइम Mumbai Crime : विवाहीत असूनही घटस्फोटीत भासवले, दुसरे लग्न करून शरीर संबंध...

Mumbai Crime : विवाहीत असूनही घटस्फोटीत भासवले, दुसरे लग्न करून शरीर संबंध ठेवले; हायकोर्टाने…

Subscribe

Mumbai Crime : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) विवाहबाह्य संबंधांवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पहिले लग्न झालेले असतानाही दुसरे लग्न करत लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्काराचा गुन्हा असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. तसेच बलात्कार आणि विवाहितेच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करता येणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने घटस्फोटित असल्याची खोटी समज देऊन विधवेशी संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या आरोपीची याचिका फेटाळली आहे. (Mumbai Crime Pretended to be divorced despite being married having sex after remarriage; The High Court)

हेही वाचा – ‘इंडिया’ नावाला टींब लावून विरोधकांच्या आघाडीने दुष्कृत्य केलं; भाजपाकडून मुंबईतील बैठकीवर हल्लाबोल

- Advertisement -

पीडित विधवा महिलेने आरोप केला की, पतीच्या मृत्यूनंतर आधीपासून ओळखीत असलेल्या आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवली. त्याने महिलेला आश्वासन दिले की, त्याचे स्वत: च्या पत्नीशी जुळत नाही, म्हणून तो तिच्यापासून वेगळे होणार आहे. त्यानंतर पहिले लग्न अस्तित्वात असताना आरोपीने 18 जून 2014 रोजी पीडित महिलेशी लग्न केले. यानंतर आरोपीने दोन वर्षे सोबत राहून मला निराधार केले. आरोपीच्या दुर्लक्षामुळे त्रासलेल्या पीडित महिलेने 27 सप्टेंबर 2019 रोजी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना त्याच्या वकिलाने दावा केला की, माझ्या अशिलाने पीडितेशी लग्न करत तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे पीडितेने केलेल्या आरोपामुळे हे बलात्काराचे प्रकरण होऊ शकत नाही. पीडित महिलेला माहिती होती की, माझ्या अशिलाने 2010 मध्ये पहिल्या पत्नीला दिलेला घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला होता. माझ्या अशिलाने पीडितेला सामाजिक, आर्थिक आणि नैतिक पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : इंडिया आघाडीची ताकद बघून चीनही मागे हटेल; संजय राऊतांना विश्वास

आरोपीच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादावर आपली भूमिका मांडताना न्यायालयाने म्हटले की, हिंदू कायदा पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसऱ्या लग्नाला परवानगी देत ​​नाही. त्यामुळे जर कोणी असे केले असेल तर तो धर्मद्वेषाचा गुन्हा मानला जातो. पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरे लग्न केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन देऊन त्याने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे हे प्रकरण बलात्काच्या कक्षेत येते, असे म्हणत न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळून लावली आहे.

- Advertisment -