Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक: सांताक्रुझमध्ये 85 वर्षीय वृद्धाचा केअर टेकरनेच घेतला जीव

धक्कादायक: सांताक्रुझमध्ये 85 वर्षीय वृद्धाचा केअर टेकरनेच घेतला जीव

Subscribe

मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांचे हात पाय बांधून तोंडात रुमाल टाकून गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे.

मुंबई, सांताक्रूझ येथे एका वृद्धाची हत्या त्याचाच केअर टेकरने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत मुरलीधर पुरुषोत्तम नाईक हे त्यांची पत्नी आणि केअर टेकर कृष्णा मानबहाद्दूर पेरियार वय-30 यांच्यासोबत सांताक्रूझ परिसरात राहत होते. आज सकाळी फोन आल्यानंतर सांताक्रूझ पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृत मुरलीधर नाईक यांची केअरटेकर कृष्णा याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केअरटेकर कृष्णा मानबहादूर पेरियार हा गेल्या 8 दिवसांपासून नाईक त्यांच्या घरी कामाला होता. पूर्णवेळ त्यांच्याच घरी राहत होता. ( Mumbai Crime Shocking Care taker Murdered of 85 year old Murlidhar Naik Santacruz )

या हत्येप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुरलीधर नाईक या इसमास डॉक्टरकडे तपासले असता त्यांना मृत घोषित केले. वृद्धाची हत्या कोणत्या कारणावरुन करण्यात आली, याचा शोध सांताक्रूझ पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

मुरलीधर पुरुषोत्तम नायक 85 वर्षे हे त्यांच्या पत्नी उमा नाईक यांच्यासोबत इमारीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. पती-पत्नी दोघेही व्यवसायाने डॉक्टर होते. मुरलीधर यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते मुंबईच्या विलेपार्ले, चेंबूर आणि नवी मुंबई भागामध्ये राहतात. वृद्ध दाम्पत्य हे एकटे राहत असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी एक केअरटेकर आणि एक गृहिणी नेमण्यात आली होती. घरातील मोलकरीण स्वयंपाक आणि साफसफाई करुन निघून जायची तर केअरटेकर हा दिवस आणि रात्र त्यांच्यासोबत असायचा.

( हेही वाचा: औरंगाबाद जिल्हाधिकारी पाण्डेयंची ED चौकशी; पंतप्रधान आवास योजना भोवणार )

- Advertisement -

केअरटेकर मुरलीधर नाईक यांच्यासोबत बेडरुममध्ये झोपायचा. सकाळी स्वयंपाकासाठी कामाला आल्यानंतर त्यांनी बेडरुमचा दरवाजा उघडा पाहिला. मुरलीधर यांना मृतावस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी शेजारच्यांना कळवले. मग त्यांनी विलेपार्ले येथे राहत असलेल्या त्यांच्या मुलाला यासंदर्भात माहिती दिली. मुरलीधर यांच्या मुलाने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

- Advertisment -