Homeक्राइमMumbai Crime : मुंबई असुरक्षित? वांद्रे टर्मिनस येथे एक्स्प्रेसमध्ये महिलेवर अतिप्रसंग

Mumbai Crime : मुंबई असुरक्षित? वांद्रे टर्मिनस येथे एक्स्प्रेसमध्ये महिलेवर अतिप्रसंग

Subscribe

मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता गजबजलेल्या वांद्रे टर्मिनसवर महिलेवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही महिलांचा विनयभंग, त्यांच्यावर अतिप्रसंग, दिवसाढवळ्या लोकांच्या गर्दीत महिलांची, तरुणींची छेड काढणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता गजबजलेल्या वांद्रे टर्मिनसवर महिलेवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वांद्रे टर्मिनस येथे हमालीचे काम करणाऱ्या हमालाने एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. शनिवारी (ता. 01 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी आरोपी हमालाला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime Woman raped in Express at Bandra Terminus)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथून एक 55 वर्षीय महिला तिच्या नातेवाईकासोबत मुंबईत आली होती. ही महिला शनिवारी रात्रीच्या सुमारास एक्स्प्रेसने वांद्र्यात आली. यावेळी तिच्यासोबत असलेला नातेवाईक काही कामानिमित्त वांद्रे टर्मिनसच्या बाहेर गेला. यावेळी महिलेला झोप लागली म्हणून ती प्लॅटफॉर्मवर झोपली. पण झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या एक्स्प्रेसमध्ये जाऊन झोपली. याचवेळी एका हमालाची नजर तिच्यावर पडली. त्याने बऱ्याच वेळ ही महिला एकटी असल्याचे पाहात ती झोपली असलेल्या डब्यात प्रवेश केला. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर महिलेसोबत असेलाल नातेवाईक तिथे आल्यानंतर तिने तिच्यावरील आपबिती त्याला सांगितली.

हेही वाचा… Shirdi Double Murder : शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली, संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने खळबळ

या घटनेच्या काही वेळातच नातेवाईकाने महिलेसोबत वांद्रे टर्मिनसवर असलेले पोलीस कार्यालय गाठले. पोलिसांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात घेत फलाटावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. महिलेने पोलिसांना हमालाची ओळख पटवून देताच आरोपीला अटक केली. यानंतर त्याला आज सोमवारी (ता. 03 फेब्रुवारी) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून कोर्टाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. रात्री 10 वाजेनंतर मुंबईतील प्रत्येक लोकलमध्ये आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलीस कर्मचारी असतात. परंतु या प्लॅटफॉर्मवर कोणीच सुरक्षा कर्मचारी का उपस्थित नव्हते? यावर अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, प्लॅटफॉर्मच्या प्रभारींवर काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.